Gold-Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold - Silver Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; तर चांदीचे भाव आजही स्थिर, खरेदी करण्याची सुर्वणसंधी !

Gold Silver Rate In Maharashtra: लग्नसराई व अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी सोने खरेदी करणे कठीणच झाले आहे.

कोमल दामुद्रे

Sone Chandi Bhav: मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच लग्नसराई व अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी सोने खरेदी करणे कठीणच झाले आहे. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचा दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

येत्या काही दिवसात येणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तामुळे ही घसरण अधिक महत्त्वाची बाब आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची (Gold) किंमत (Price) 55,930 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,020 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 785 रूपये आहे. (Gold Silver Price update 18 April 2023)

1. जाणून घ्या तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,630 रुपय

दिल्ली - 61,170 रुपये

हैदराबाद - 61,020 रुपये

कोलकत्ता - 61,020 रुपये

लखनऊ - 61,170 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,020 रुपये

नागपूर - 61,020 रुपये

पुणे - 61,020 रुपये

2. मागच्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव

२०२२ ला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,200 रुपये होती. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,510 रुपये होता. यंदा अक्षय्य तृतीया येण्याआधीच सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली आहे.

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT