Gold-Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची सुवर्धसंधी ! जाणून घ्या आजचे दर

Gold Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण दिसून आली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत उंच्चाक व घसरण पाहायला मिळाली. त्यातच यंदाचा आठवडा हा अक्षय्य तृतीयासारखा शुभ मुहूर्त असल्यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या (Gold) दरात पुन्हा घसरण दिसून आली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Price) 55,940 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,030 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 785 रूपये आहे.

1. जाणून घ्या तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,640 रुपये

दिल्ली - 61,180 रुपये

हैदराबाद - 61,030 रुपये

कोलकत्ता - 61,030 रुपये

लखनऊ - 61,180 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,030 रुपये

नागपूर - 61,030 रुपये

पुणे (Pune) - 61,030 रुपये

2. मागच्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव

२०२२ ला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,200 रुपये होती. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,510 रुपये होता. यंदा अक्षय्य तृतीया येण्याआधीच सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली आहे.

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडेंना इशारा; आता संघर्ष आणखी पेटणार? VIDEO

Wednesday Horoscope : अविवाहित तरुणांचं सूत जुळणार; 5 राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

सरकार साधणार होळीचा मुहूर्त; कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता

SCROLL FOR NEXT