Gold Silver Rate, Gold Rate Today, Gold Price updates
Gold Silver Rate, Gold Rate Today, Gold Price updates  Saam TV
देश विदेश

Gold Price Today : सोन्याचा भाव 52 हजारांच्या पार, चांदीही चकाकली; पाहा आजचे दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोन्याच्या (Gold) दरात मोठी उसळी (Price Hike) पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन ट्रेडिंग सत्रात सोने सुमारे 1700 रुपयांनी महागले असून त्याची किंमत पुन्हा एकदा 52 हजारांच्या पुढे गेली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 323 रुपयांनी वाढून 52,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सकाळी सोन्याचा व्यवहार 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅमने सुरू झाला, परंतु पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे काही वेळातच त्यात उसळी दिसून आली. सोने त्याच्या आधीच्या बंद किमतीपेक्षा सुमारे 0.6 टक्क्यांनी उसळी घेत आहे. सरकारने शुक्रवारी सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढवले, ज्याचा परिणाम किंमतीवर होत आहे. (Gold And Silver Price Today)

हे देखील पाहा -

चांदीचीही चमक वाढली

गेल्या अनेक सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या चांदीच्या दरातही आज उसळी आली. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 58 रुपयांनी वाढून 57,800 रुपये प्रति किलो झाला. चांदीचा भाव मागील बंदच्या तुलनेत 0.10 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यातील संपूर्ण व्यवहारात चांदीच्या दरात तीन हजार रुपयांहून अधिक घसरण झाली होती.

जागतिक बाजारात सर्व धातूंच्या किंमतीत घसरण

जागतिक बाजारात सोने आणि चांदीमुळे सर्व मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट किंमत 1,812.40 डॉलर प्रति औंस आहे, जी मागील बंदच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत 19.86 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली, जी मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.25 टक्क्यांनी कमी आहे. प्लॅटिनमची स्पॉट किंमत $886 आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.56 टक्के कमी आहे. याशिवाय, पॅलेडियमची स्पॉट किंमत मागील बंद किंमतीपेक्षा 1.17 टक्क्यांनी घसरून $ 1,860 वर आली आहे.

सोन्याचा भाव आणखीन वाढणार

सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर त्याच्या किंमती आणखीन वाढणार आहेत. एमसीएक्सवर सोने ५३ हजारांच्या वर जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी दोन हजार रुपयांनी वाढ होईल, असा अंदाज होता, मात्र सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे गोल्ड ईटीएफ गुंतवणूक कमी होत आहे. शुक्रवारी ते 0.8 टक्क्यांनी घसरून 1,041.9 टनांवर आले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Today's Marathi News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दादर शिवाजी पार्कवर पोहोचणार

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT