Gold  Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price: खुशखबर! स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; सोने चांदी दरात मोठी घसरण, पाहा आजचा भाव

जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Price) कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे. आज म्हणजेच बुधवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 22 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 48,100 आहे. तर 24 कॅरेट सोने 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 362 रुपयांनी वाढून 58,850 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

हे देखील पाहा -

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेटच्या सोन्याला सर्वात शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नसते. त्याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. इतर 8.33 टक्के इतर धातूंचा समावेश आहे. त्याच वेळी 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध असते. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोट्यवधी WhatsApp युजर्सना मोठा दणका; १ मार्चपासून बंद होणार

मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार, भुजबळांचा VSR विमानानं मुंबई-नाशिक प्रवास, बघा VIDEO

Tamil Superstar Divorce: फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ; सुपरस्टार अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ, २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट होणार

Maharashtra Live News Update: फलटण तालुक्यातील विडणी येथे रानगव्याचा धुमाकूळ; एक जण गंभीर जखमी

कल्याणमध्ये कुत्र्याने घेतला आणखी एक बळी; भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT