Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. आजही सराफा बाजारात सोन्याच्या दरात उतार पाहायला मिळाला. सराफा बाजारात सोन्याचा दर ५८,८०० रेकॉर्ड स्तरावरून २,३०० रुपयांनी स्वस्त झाल्याचा पाहायला मिळाला आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी १०:४० वाजता सोन्याचा दर (MCX Gold Silver) 210 रुपयांनी ५६,५४० रुपयांवर आला आहे. गेल्या वेळी सोन्याचा दर ५६, ७५० रुपये होता. (Latest Marathi News)
सराफा बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त
सराफा बाजारात सोने-चांदीचा दर घसरल्याचा पाहायला मिळत आहे. दिल्लीत मंगळवारी सोन्याचा दर ५५ रुपयांनी घसरून ५६,८८५ रुपये प्रति १० ग्राम होता. मागच्या सत्रात सोन्याचा दर ५६,९२० रुपये प्रति १० ग्राम होता. चांदीची किंमत ४५५ रुपयांनी घसरून ६६,५४५ रुपये प्रति किलो झाली होती.
आजचा सोन्याचा भाव काय?
आज सकाळी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा (Gold) भाव घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५७ हजार १६० इतका झाला आहे.
दुसरीकडे २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली. त्यामुळे आज २२ कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा भाव प्रतितोळा ५२ हजार ४०० इतका झाला आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ६१८ रुपये आहे.
आजचा चांदीचा भाव काय?
आज सोन्याबरोबर चांदीच्या (Silver) दरातही घसरण दिसून आली. सध्या दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर ६५,८४२ हजार रुपयांवर पोहचला आहे.
सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.
शुद्ध सोने कसे ओळखावे?
सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.