gold silver rate :  Saam tv
देश विदेश

अमेरिका-इराणच्या युद्धाचा सोने-चांदीच्या दरावर मोठा परिणाम; परदेशात भाव कोसळले, भारतात परिस्थिती काय?

gold silver rate : अमेरिका-इराणच्या युद्धाचा सोने-चांदीच्या दरावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. परदेशात भाव कोसळले असताना भारतात किंचित सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

अमेरिकेचा शस्त्रसंधीचा अवधी वाढवण्यास नकार

युद्धाचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम

भारतात सोने-चांदीच्या दरात किंचित वाढ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा अवधी वाढवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानात होणारी दुसरी बैठक अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. इराण-अमेरिका युद्ध अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा गुंतवणूकदारामध्ये आहे. परंतु युद्ध संपण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितलं जात आहे. याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे.

सध्या देशाची राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५७ लाखांहून अधिक किंमतीवर पोहोचला आहेत. तर एक किलो चांदीची किंमत २.५८ लाखांवर पोहोचली आहे. इराण-अमेरिकेतील तणावामुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीत चांदीची किंमत ७०० रुपयांनी वाढून २.५८ लाख रुपये प्रति किलो झाली. भू-राजकीय अनिश्चितता आणि संमिश्र जागतिक संकेतामुळे सोन्याच्या दरावर मोठा रिणाम पाहायला मिळतोय. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०० रुपयांनी वाढ होऊन १,५७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. घरगुती बाजारातही सोन्याच्या दरात किरकोळ तेजी पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीत चांदीची किंमत ७०० रुपयांनी वाढून २.५८ लाख रुपये प्रति किलो झाली. भू-राजकीय अनिश्चितता आणि संमिश्र जागतिक संकेतामुळे सोन्याच्या दरावर मोठा रिणाम पाहायला मिळतोय. ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०० रुपयांनी वाढ होऊन १,५७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. घरगुती बाजारातही सोन्याच्या दरात किरकोळ तेजी पाहायला मिळत आहे.

परदेशी बाजारात सोने-चांदी स्वस्त

परदेशात चांदी १.२९ टक्क्यांनी घसरून प्रति औंस ७८.६९ डॉलरवर आली आहे. तर सोने १ टक्क्यांनी कोसळून प्रति औंस ४,७७६.८५ डॉलरवर आलं आहे. मीराए असेट शेअरखानमध्ये कमोडिटीज प्रमुख प्रवीण सिंह यांनी सांगितलं की, डॉलर मजबूत झाल्याने अमेरिका-इराणच्या युद्धामुळे सोन्याचा दर प्रति औंस ४,७८० डॉलरवर स्थिरावला आहे. त्याचदरम्यान, इराण-अमेरिकामधील शस्त्रबंदीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज अमेरिका काय भूमिका घेणार, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT