

सोन्या-चांदीला मिळाली झळाळी
सोन्याच्या दरात मोठी वाढ
ग्राहक पुन्हा सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीकडे वळले
अमेरिका, इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरात व्यापारावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. युद्धामुळे जगातील विविध देशात अस्थिर वातावरण पाहायला मिळत आहे. युद्धामुळे नागरिकांना एलपीजी गॅस पुरवठा तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. हॉटेल, कंपन्यांना पुरवण्यात येणाऱ्या कर्मिशियल गॅस पुरवठ्यावर बंधने लादण्यात आली आहे. खरंतर युद्धजन्य परिस्थितीत नागरिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे वळतात. परंतु मागील महिनाभरात उलट परिस्थिती पाहायला मिळाली. परंतु या दोन दिवसांत सोने-चांदी तेजीत आहे.
सराफा बाजार सुरू झाल्यानंतर बुधवारी सोन्याचा दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा दरात १ तोळ्यामागे ३७६० रुपयांनी वाढ झाली. तर १० तोळ्यामागे ३७,६०० वाढ झाली. बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १४६६७० रुपये इतका झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३४४५० रुपये इतका झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ११,००१० रुपये इतका झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध थांबवण्याविषयीच्या विधानामुळे व्यापार,शेअर बाजार, सराफा बाजारावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोने-चांदीला तेजी आल्याचे बोलले जात आहे.
सोन्याचा दर
१,४६,६७० - २५ मार्च दर (१० ग्रॅम प्रति तोळा)
१,४२,८१० - २४ मार्च दर (१० ग्रॅम प्रति तोळा)
चांदीच्या दरातही वाढ
सोन्यासहित चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. एक किलो चांदी अडीच लाखांवर पोहोचली आहे. एक किलो चांदीच्या दरात तब्बल १५ हजारांनी वाढ झाली आहे. चांदीच्या एका ग्रॅममागे तब्बल २५० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.