Gold- Silver Price Today  Saam TV
देश विदेश

Gold Silver Price: आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

सोने महागले, चांदीचे भावही वाढले, जाणून घ्या सोन्या-चांदीचे ताजे दर

वृत्तसंस्था

Gold Silver: देशातील सराफा बाजारात आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या (Gold) दरात गेल्या २ दिवसांपासून सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्यासोबतच चांदीचे (Silver) भावही गडगडले आहेत. आज वायदा बाजारात सोन्याने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीचे भाव 53,627 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50, 865 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा दर 53,627 रुपयांवर पोहोचला आहे.

हे देखील पाहा -

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्ली - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,320 रुपये

मुंबई - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,160 रुपये

पाटणा- 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,190 रुपये

कोलकाता - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,160 रुपये

बंगळुरू - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,200 रुपये

जयपूर - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51, 320 रुपये

अहमदाबाद - 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,200 रुपये

असा तपासा सोन्याचा भाव

आता सोन्या बरोबरच चांदीचे दरही तुम्ही घसबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्या-चांदीचे नवीनतम दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ असं या अॅपचं नाव आहे. याअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT