गोव्यातील अर्पोरा भागातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीची भीषणता वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे. यात परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला बेली डान्स करीत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आगीच्या ठिणग्या पडत असल्याचं दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओ अपघाताच्या वेळीचा आहे. नाईटक्लबमध्ये महिला नर्तकी बेली डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. मेहबूबा-मेहबूबा या गाण्यावर महिला बेली डान्स करत होती. नाईटक्लबमधील उपस्थित असलेले लोक महिला नर्तकीच्या बेली डान्सचा आनंद घेत होते. अचानक नाईटक्लबच्या छतावरून काचचे तुकडे पडले. आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. आगीच्या ज्वाळा पाहून सर्वजण घाबरले,
आगीच्या ठिणग्या दिसल्यानंतर नर्तकीने नृत्य थांबवले. यानंतर उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. असे म्हटले जाते की, नाईट क्लबचे एक्झिट गेट खूपच लहान होते. यामुळे लोकांना तेथून बाहेर पडण्यास वेळ लागला. काही लोक घाबरून स्वयंपाकघराच्या दिशेनं पळाले. आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. काही लोकांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला तर, ६ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर नाईट क्लबच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये चार पर्यटक आणि १४ क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर ७ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास सुरू आहे. पोलीस आणि अग्निशमन विभाग या घटनेची अधिक चौकशी करीत आहेत. प्राथमिक अहवाल लवकरच तयार होईल. यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.