BJP  Saam Tv
देश विदेश

Goa Elections: प्रचार संपला तरी आरोप सुरूच! भाजपावर पैसे वाटपाचा आरोप

सोशल मीडियावर (Social Media) या यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे असले तरी अद्याप पोलिसांकडून (Police) याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

गोवा - भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गोवा येथील केपे मतदारसंघात आमनेसामने आले आहेत. यावेळी काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी भाजपाचे (BJP)कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर (Social Media) या यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे असले तरी अद्याप पोलिसांकडून (Police) याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

हे देखील पहा -

काँग्रेसने देखील याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या व्हिडिओत काँग्रेसचे कार्यकर्ते एका दुचाकीचा पाठलाग करारात असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवरील दोन जण भाजपाचे कार्यकर्ते आहेत तसेच ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. काँग्रेसने भाजप विरोधात केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

गोव्यात प्रचारतोफा थंडावल्या असून १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी गोव्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे. केपे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार एल्टन डिकोस्टा यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे उमेदवार चंद्रकांत कवळेकर यांचे कार्यकर्ते केपे येथील मतदारांना रात्री उशीरा पैसे वाटत होते, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

Kidney Stones : किडनी स्टोनचा धोका टाळायचाय? रोज प्या 'इतके' ग्लास पाणी

Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT