Goa Road Accident: गोव्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गोव्याच्या फोंडा- गोवा महामार्गावर एका भरधाव मर्सिडिजने सहा गाड्यांना उडवले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फोंडा-पणजी (Fonda- Goa Highway Accident) महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. फोंड्याकडून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव मर्सिडिज कारने तीन चारचाकी गाड्या आणि तीन दुचाकींना उडवल्याने ही दुर्घटना घडली.
या भीषण अपघातात तीन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सुरेश फडते, भावना फडते आणि अनुप कर्माकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तसेच अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडिज चालकाला मार्दोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परेश ए. सिनाई सावर्डेकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. उपस्थितांनी मद्दधुंद अवस्थेत गाडी चालवण्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला असून या विचित्र अपघाताचा पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.