मृतदेह Saam TV
देश विदेश

काकाने कपडे घ्यायला शाळेतून नेलं, नग्नावस्थेत आढळली पुतणी; गुप्तांगावर ब्लेडचे निशाण

14 वर्षीय मुलीला तिच्या काकाने शाळेतून ड्रेस आणण्यासाठी नेलं होतं, ते दोघेही यानंतर बेपत्ता होते अखेर या दोघां काका-पुतणीचा नागोरमध्ये मृतदेह सापडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयपूर : 14 वर्षीय मुलीला तिच्या काकाने शाळेतून ड्रेस आणण्यासाठी नेलं होतं, ते दोघेही यानंतर बेपत्ता होते अखेर या दोघा काका-पुतणीचा मृतदेह नागोरमध्ये सापडला आहे. मृत मुलीच्या आजोबांनी आपली १४ वर्षीय नात बेपत्ता झाल्याने मयत काकाच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या (Police) प्राथमिक तपासानुसार काकानेच पुतणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या दोघांची हत्या केली असून यामध्ये २ ते ३ जण सामील असल्याचं मुलीच्या वडिलांच म्हणणं आहे. आजोबांनी पोलिसांना सांगितलं होतं की, मुलीचा काका तिला तिच्या शाळेतून ड्रेस (Dress) घेण्यासाठी जात असल्याचं सांगूण घेऊन गेला होता. त्यानंतर ते दोघेही बेपत्ता होते दरम्यान, काकाचा गळफास घेतल्याची अवस्थेत मृतदेह आढळला आहे तर मुलगी नग्न अवस्थेत सापडली आहे.

अशी झाली दोघे बेपत्ता -

खिवसर पोलीस स्टेशन (Khivsar Police Station) हद्दीमधील एका गावातील ३० वर्षीय काकाने ३ दिवसांपूर्वी गावामधीलच सरकारी शाळेत शिकणाऱ्या आपल्या 14 वर्षीय पुतणीला गोडीवरुन होळीसाठी नवीन कपडे देणार असल्याचं सांगून घेऊन गेला. मात्र त्यानंतर काका-पुतणी गायब झाले ते परतलेच नाहीत. दरम्यान, घरातील सदस्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर आता काकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत तर मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळलाय.

धक्कादायक बाब म्हणजे या काकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता, मात्र पुतणीचा न्यूड मृतदेह एका खड्ड्यात पुरला होता एवढेच नव्हे तर या मुलीच्या गुप्तांगासह तिच्या शरीरातील अनेक भागांवरती ब्लेडने कापल्याचे निशाण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT