Ghulam Nabi Azad-Rahul Gandhi Congress News Update SAAM TV
देश विदेश

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांचे जाता-जाता राहुल गांधींवर गंभीर आरोप, ५ पानी पत्रात काय म्हटलं?

काँग्रेसला रामराम करताना सोनिया गांधींना लिहिलेल्या पाच पानी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचा सध्याचा पडता काळ आहे. अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. अशात आता ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेल्या आझाद यांनी जाता-जाता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आझाद यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा देताना सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना लिहिलेल्या पत्रात आपली नाराजी स्पष्टपणे उघड केली आहे. काँग्रेसमध्ये मिळालेल्या जबाबदारीबाबत ते गेल्या काही दिवसांपासून समाधानी नव्हते. याबाबत त्यांनी पक्षाकडे अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली होती.

पक्षात आपल्याला उचित जबाबदारी देण्यात आलेली नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी जम्मू-काश्मीरसह राष्ट्रीय पातळीवर मोठं नुकसान करणारा ठरणार आहे, असं मानलं जातंय.

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पक्षाचा नवा अध्यक्ष सुद्धा फक्त नावापुरताच असणार आहे, असं आझाद म्हणाले. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केल्याचा आरोपही त्यांनी केला.

गुलाम नबी आझाद यांनी नेतृत्वाला लिहिलेल्या पाच पानी पत्रात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाची जी अवस्था झाली आहे, त्याला राहुल गांधी (Rahul Gandhi) जबाबदार आहेत, असं त्यांना वाटतंय. राहुल गांधींचं नेतृत्व हे बालिश आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

राहुल गांधी यांनी पक्षात आपले मत मांडण्यासाठी जागाही सोडली नाही. पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा खेळ मांडला गेला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

तत्पूर्वी १६ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद यांची राज्यातील पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून निवड केली होती. मात्र, आझाद यांनी हा प्रस्ताव धुडकावला होता. जम्मू-काश्मीरमधील पक्षात सुधारणा करण्यासाी गांधी यांनी आझाद यांचे जवळचे मानले जाणारे विकार रसूल वानी यांना जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT