Ghulam Nabi Azad On Congress
Ghulam Nabi Azad On Congress SAAM TV
देश विदेश

Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi: राहुल गांधींमुळं मनमोहन सिंग PM पद सोडणार होते; आझाद यांचा खळबळजनक दावा

Nandkumar Joshi

Ghulam Nabi Azad On Congress: डेमोक्रेटिक आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडल्यामुळे मनमोहन सिंग नाराज झाले होते आणि ते पंतप्रधानपद सोडणार होते, असा दावा करून आझाद यांनी खळबळ उडवून दिली.

जर आज तो कायदा अस्तित्वात असता तर, खुद्द राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी वाचली असती, असेही ते म्हणाले. आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी आझाद बोलत होते.

राहुल गांधी हे राष्ट्रपती नव्हते. तरीही त्यांच्यामुळे अध्यादेश मागे घेण्यात आला, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. मात्र, त्यावेळी यावर आवाज का नाही उठवला याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींसमोर झुकायला नको होते. त्यावेळचे मंत्रिमंडळ हे कमकुवत होते, असंही आझाद म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद यांनी यावेळी शायरीतून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. खुद किए तुमने अपनी दीवारों में सुराख, अब कोई झांक रहा है तो शोर कैसा. जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये असता, त्यावेळी कणाहीन असता, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यासह नेते सूरत कोर्टात गेले होते, त्यावरही आझाद यांनी भाष्य केले. राहुल गांधी यांच्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडला, असंही त्यांनी सांगितले.  (Latest Marathi News)

काँग्रेसवर टीकास्त्र

आझाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आम्ही २४ तास झोपेतून उठून मोदी आणि भाजपवर टीका करू शकत नाही. परराष्ट्र धोरणात जग अपयशी ठरलं, पण भारत यशस्वी झाला. काही गोष्टींमध्ये भाजपनेही सुधारणा कराव्यात अन्यथा त्यांचेही काँग्रेससारखे हाल होतील, असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेस नेत्यांकडून आझाद यांच्यावर प्रहार

आझाद यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिलं आहे. पवन खेरा म्हणाले की, ज्या पक्षाने एका कार्यकर्त्याला इतका मोठा नेता केला आणि तोच आज पक्षाला नाव ठेवतोय. त्यांनी पक्षाचा विश्वास तोडला आहे. आझाद झालो असं ते पक्ष सोडताना म्हणाले होते, आज आम्हाला हेच वाटतंय की ते गुलाम झालेत. आझाद नाही, अशा शब्दांत खेरा यांनी पलटवार केला.

यावेळी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, गुलाम नबी आझाद आज जे काही बोलत आहेत, त्यावरून भाजपसोबत डील झाली आहे हे स्पष्ट होतंय. भाजपकडून काही हवं असल्यास राहुल गांधींचा अपमान करा अशी त्यांची पहिली अट असते. त्यांना काहीही बोलू द्या, राहुल गांधी काय आहेत, ते अख्ख्या देशानं बघितलंय. राहुल गांधींना आझाद यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

Rohit Sharma,Mumbai Indians: रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? सामन्याआधी तो व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT