Ghulam Nabi Azad Announce New Democratic Azad Party in Jammu kashmir ANI
देश विदेश

Democratic Azad Party : गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Azad New Party : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे. गुलाबनबी आझाद यांनी आपल्या पक्षाचं नाव 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी' असे घोषित केलं आहे. गेल्या महिन्यात आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. (Ghulam Nabi Azad Announce New Democratic Azad Party in Jammu kashmir)

गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मूत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी आझाद म्हणाले, 'आमचे राजकारण जात किंवा धर्मावर आधारित असणार नाही. आम्ही सर्व धर्म आणि राजकीय पक्षांचा आदर करू. मी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा नेत्यांवर वैयक्तिक हल्ले केले नाहीत. मी धोरणांवर टीका करतो. राजकीय नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करणे टाळले पाहिजे'.

गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेस सोडल्यानंतरही गुलाम नबी आझाद यांनी राज्याचा दौरा केला होता. यादरम्यान गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षासाठी समर्थकांशी चर्चा केली आणि दिल्लीत पक्षाच्या नावाबाबत विचारमंथन केले. नव्या पक्षाची विचारधारा त्यांच्या नावासारखी असेल आणि त्यात फक्त सर्व धर्मनिरपेक्ष लोकच सहभागी होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले होते.

26 ऑगस्ट रोजी काँग्रेसमधून राजीनामा दिला

गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यासोबतच आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री, 8 माजी मंत्री, एक माजी खासदार, 9 आमदार, पंचायत राज संस्थानचे मोठ्या संख्येने सदस्य, जम्मू-काश्मीरमधील नगरपरिषद आणि तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

1973 मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली होती. 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी पतका फडकवली होती. त्यानंतर 1982 मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT