Ghaziabad Mall Rape And Murder Case Crime News  Saam Tv
देश विदेश

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Ghaziabad Mall Rape Case Update News : गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेन्शनमध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉलच्या बेसमेंटमध्ये मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेन्शनमध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

  • अत्याचार करून पीडितेची हत्या

  • मॉलच्या बेसमेंटमध्ये मृतदेह आढळला

  • पोलिसांनी तपास सुरू केला आहे

गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेन्शन परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका मॉलच्या बेसमेंटमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मॉलच्या बेसमेंटमध्येच मुलीला टाकून आरोपी फरार झाला. दरम्यान बेसमेंटमध्ये मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे आई-वडील संबंधित मॉलच्या बांधकामावर मजुरीचे काम करतात. ते कामाच्या ठिकाणीच झोपडीत वास्तव्यास आहेत. शुक्रवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर शनिवारी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मॉलच्या बेसमेंटमध्ये एका मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

मुलीच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, मृत्यूपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचीही धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.प्राथमिक तपासात मुलीला मॉलच्या वरच्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण, बलात्कार, खून आणि पॉक्सो अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार ते पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. ओळख पटलेले दोन संशयित सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी सुरू आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT