Gautam Adani Overtakes Bill Gates Saam Tv
देश विदेश

Forbes Billionaires: बिल गेट्सला मागे टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती

Real Time Billionaires - Forbes: बिझनेस टायकून गौतम अदानी यांची एकूण संपत्ती गुरुवारी $115.5 अब्ज झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून ते जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. (Gautam Adani 4th richest person) फोर्ब्सच्या (Forbes) रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. 60 वर्षीय बिझनेस टायकून गौतम अदानी यांची एकूण संपत्ती गुरुवारी $115.5 अब्ज झाली आणि बिल गेट्स $104.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत खाली घसरले. (Gautam Adani Latest News)

हे देखील पाहा -

अब्जाधीशांच्या यादीत 90 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी दहाव्या स्थानावर आहेत. तर टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क, जे सध्या ट्विटर विकत घेण्याचा करार तोडल्यानंतर वादात सापडले आहेत, त्यांची एकूण संपत्ती $235.8 अब्ज आहे ते अजूनही पहिल्या स्थानावर विराजमान आहेत. गौतम अदानी हे बंदरे, खाणी आणि हरित ऊर्जा क्षेत्र यांसह छोट्या कमोडिटी व्यवसायाचे मोठ्या समूहात रूपांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

अदानी समूहाचे काही लिस्टेड शेयर्स गेल्या दोन वर्षांत 600 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. जे पीएम मोदींनी $ 2.9 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न केल्यामुळे हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांच्या योजनांना चालना आहे. पंतप्रधान मोदी 2.9 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि 2070 पर्यंत भारताला जीरो-कार्बन स्टेट (शून्य-कार्बन राज्यः बनवण्याच्या दिशेने काम करत आहेत." ब्लूमबर्गने नुकतेच हे वृत्त दिले जेव्हा गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी यांना मागे टाकले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT