Gas Tanker Explodes In South Africa
Gas Tanker Explodes In South Africa Saam tv
देश विदेश

Gas Tanker Explodes In South Africa: दक्षिण आफ्रिकेत गॅस टँकरचा भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू

Vishal Gangurde

South Africa News : दक्षिण आफ्रिकेतील बॉक्सबर्ग शहरातून भीषण स्फोटाचं वृत्त हाती आलं आहे. या गॅसचा भीषण स्फोट होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) बॉक्सबर्ग शहरातील गौटेंग प्रांतातील शहरात स्फोटाची घटना घडली आहे. बॉक्सबर्गमध्ये शनिवारी सकाळी गॅस ट्रकसोबत एक दुर्घटना झाल्यानंतर भीषण स्फोट झाला आहे. स्फोट हा ओआर टॅम्बो मेमोरियल रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरील रुग्णालय रोडवर झाला आहे. ट्रक हा एलपी गॅसचा असल्याचे सांगितले जात आहे. आगीच्या घटनेनंतर टॅम्बो रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. (Gas Tanker Explodes In South Africa)

या घटनेबाबत एमर-जी-मेड काइल वैन रीनन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमर-जी-मेड काइल वैन रीनन म्हणाले की, 'आपात्कालीन सेवा एजन्सी ही बॉक्सबर्ग येथील घटनास्थळी उपस्थित आहे. घटनास्थळी एका गॅसचा टँकरचा स्फोट झाला आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT