दिल्ली कोर्टातच गॅंगवॉर; गँगस्टर गोगी सह चार जणांचा मृत्यू!  Saam Tv
देश विदेश

दिल्ली कोर्टातच गॅंगवॉर; गँगस्टर गोगी सह चार जणांचा मृत्यू!

दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. रोहिणी कोर्टात rohini court गोळीबार झाला आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

दिल्ली : दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. रोहिणी कोर्टात rohini court गोळीबार झाला आहे यात गँगस्टर गोगी Gangster Gogi हा ठार झाला आहे. या गोळीबार मध्ये अन्य चार लोकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात हा गँगवॉर झाला. आज शुक्रवारी दुपारी रोहिणी कोर्टात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर Most Wanted Gangster जितेंद्र ऊरफ गोगी याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. ज्यानंतर कोर्टातच गोळीबार झाला त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना ठार मारलं आहे.

या शूटआऊटमध्ये आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्यात एक गँगस्टर गोगीसह दोन हल्लेखोरांचा समावेश आहे. अन्य व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही.

गोगी तिहार जेलमध्ये होता;

गोगी तिहार जेलमध्ये होता त्याला आज शुक्रवारी सुनावणीसाठी कोर्टात आणण्यात आलेलं होतं. याच दरम्यान हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे न्यायाधीशांसमोर Judge हा गोळीाबार झाला आहे.

दोन हल्लेखोर वकिल बनून कोर्टात आले होते;

दिल्ली पोलिसांनी याबद्दल माहिती दिली की, दोन हल्लेखोर वकिल बनून कोर्टात आले होते. ज्यांनी गँगस्टर गोगीवर गोळीबार केला.

दिल्लीच्या टिल्लू गँगनं गोगीची हत्या केली आहे असे म्हंटले जात आहे. जे दोन हल्लेखोर होते ते ठार झाले आहेत. त्यापैकी एकाच नाव राहुल होते तर माहितीनुसार, त्याच्यावर 50 हजारांचं बक्षीस होते. तर दुसऱ्या हल्लेखोराचे नाव मौरिश आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय राजकारण घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

ठाण्यात शिंदेसेनेत नाराजीनाट्य, मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, शिंदेसेनेत अस्वस्थता

राष्ट्रवादी विलिनीकरणाला सुरूवात? महापालिका निमित्त, त्यानंतर कायमचं एकत्र?

SCROLL FOR NEXT