Mahdya Pradesh Ganesh Visarjan Saam Tv
देश विदेश

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

Mahdya Pradesh Ganesh Visarjan: गणपती विसर्जन करून आल्यानंतर मंडपामध्ये झोपलेल्या गणेश भक्तांसोबत भयंकर घडलं. विजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • गणेश विसर्जनानंतर विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू

  • मध्य प्रदेशातील मंडला येथे घडली घटना

  • गणेश पंडालमध्ये विजेचा धक्का लागून चौघांचा मृत्यू

  • मंडला जिल्ह्यात गणेश पंडालमध्ये घडली घटना

मध्य प्रदेसमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना घडली. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील नैनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर गावात विजेचा धक्का लागून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला मंडला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर सर्वजण घरी परत आले. काही जण पंडालच्या मंचावरच झोपी गेले. हे सर्वजण झोपेत असतानाच अचानक पंडालमध्ये विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे ५:३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बिरेंद्र भांगर (५५ वर्षे), कृष्णकुमार भांबरे (१९ वर्षे), रवी (२४ वर्षे) आणि जैनू भांबरे (३९ वर्षे) या चार जणांचा मृत्यू झाला. नैनपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी मानसराम वागेन यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ते तरुण गणेश पंडालमध्ये झोपले होते. शॉर्ट सर्किटमुळे अॅम्प्लिफायरची कनेक्शन वायर तुटून त्यांच्यावर पडली. या घटनेच चौघांनी जागीच प्राण सोडले.

मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिसर आणि आजूबाजूचा परिसर दमट झाल्यामुळे तुटलेल्या वीजेच्या तारेच्या संपर्कात चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. नैनपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Death News : ८ वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Ginger Benefits: सलग ११ दिवस कच्चं आलं खा; वजन कमी होण्यासोबत शरीराला होतील 7 फायदे

Decoding Abhang: ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ’… ओव्हरथिंकिंग का होतं? संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळेल उत्तर

SCROLL FOR NEXT