Pm Modi On G20 Summit 2023 Saaam Tv
देश विदेश

G20 Summit 2023: G-20 शिखर परिषदेत PM मोदींचा जगाला 'महामंत्र'; भाषणातील १० ठळक मुद्दे

Pm Modi On G20 Summit 2023: G-20 शिखर परिषदेत PM मोदींचा जगाला 'महामंत्र'; भाषणातील १० ठळक मुद्दे

Satish Kengar

Pm Modi On G20 Summit 2023:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G20 शिखर परिषदेचे उद्घाटन मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. आज सकाळी पंतप्रधान मोदींनी G-20 शिखर परिषदेचे ठिकाण भारत मंडपम येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील अनेक देशांच्या नेत्यांचे स्वागत केले. यावेळी भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागत भाषणाचे दहा ठळक मुद्दे:

1. मोरोक्कोमधील भूकंपात जखमी झालेल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि शक्य ती सर्व मदत करू. या कठीण काळात संपूर्ण जग मोरोक्कोच्या पाठीशी उभे आहे. सर्व जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.

2. G20 शिखर परिषदेसाठी आम्ही सर्व प्रतिनिधींचे स्वागत करतो. या 21व्या शतकात आपण एक नवीन जागतिक व्यवस्था पाहत आहोत. मानवकेंद्री दृष्टिकोन ही काळाची गरज आहे.

3. ही अशी वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. (Latest Marathi News)

4. जर आपण कोविड-19 ला पराभूत करू शकलो, तर आपण विश्वासाच्या कोणत्याही समस्येशी लढू शकतो. आम्ही जगातील विश्वासाची कमतरता अधिक विश्वासार्ह नातेसंबंधांमध्ये रूपांतरित करण्याची शपथ घेतो. आपल्याला जागतिक विश्वासाची कमतरता भरून काढायची आहे.

5. G20 चे भारताचे अध्यक्षपद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील समावेशाचे प्रतीक आहे. चांगले भविष्य घडविण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.

6. आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. अशा वेळी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो.

7. उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, अन्न आणि इंधन व्यवस्थापन, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा किंवा जलसुरक्षा असो, आपल्याला भविष्यातील पिढ्यांसाठी ठोस उपाय हवे आहेत.

8. भारताने आफ्रिकन युनियनला G20 चे स्थायी सदस्य बनवण्याची ऑफर दिली आहे. मला विश्वास आहे की, सर्व सदस्य या प्रस्तावाला सहमती देतील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आफ्रिकन युनियनला G20 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.

9. 21 व्या शतकातील हा काळ एक महत्त्वाचा काळ आहे, जो संपूर्ण जगाला नवी दिशा दाखवत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत. त्यामुळे मानवकेंद्री दृष्टिकोन ठेवून सर्व जबाबदाऱ्या पार पाडून पुढे जायचे आहे.

10. भारताचे G20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशकतेचे आणि एकतेचे प्रतीक बनले आहे. भारतात ते पीपल्स G20 बनले आहे. कोट्यवधी भारतीय त्यात सामील झाले, देशातील 60 हून अधिक शहरांमध्ये 200 हून अधिक सभा झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar: बारामतीमध्ये मोठी घडामोड, श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

Hingoli News : वंचितच्या उमेदवारांवर अज्ञातांकडून हल्ला; गाडीवर केली दगडफेक

Railway Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप सी आणि डी पदांसाठी भरती, पगार किती? जाणून घ्या

Ayush Shinde: 24 षटकार, 43 चौकार! आयुषची Harris Shield मध्ये रेकॉर्डब्रेक खेळी; सचिनला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना, पोलिसांचा चोख बंदोबस्त

SCROLL FOR NEXT