Viral Funny Video Saam TV
देश विदेश

Viral Funny Video: लग्नात नाचताना पठ्ठ्यानं कहरचं केला; शायनिंगच्या नादात चक्क नवरीच्या तोंडावर दिली लाथ

त्याची लाथ इतकी जोरात होती की,नवरी खुर्चीवरून थेट जमिनीवर कोसळते.

Ruchika Jadhav

Viral Funny Video: लग्न म्हटल्यावर सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं. नवरा आणि नवरी दोघेही आपल्या लग्नासाठी मस्त तयार होतात. अशात लग्न म्हटल्यावर नाचंगाणं तर आलंच. लग्नात नाचताना घडलेल्या अनेक करामतींचे फोटो आणि व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ इतके फनी असतात की, हसून हसून अगदी पोट दुखू लागतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील खळखळून हसाल. (Latest Viral Funny Video)

सध्याच्या काळात लग्नात नवरी किंवा नवरदेवाचा स्पेशल डान्स हमखास पहायला मिळतो. आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी अनेक जण बऱ्याच दिवसांपासून या डान्सची तयारी करतात. मात्र एका नवरदेवाला हा डान्स चांगलाच महागात पडला आहे. कारण त्याने डान्स करण्याच्या नादात चक्क नवरीच्या तोंडावर जोरदार लाथ मारली आहे.

त्याची लाथ इतकी जोरात होती की,नवरी खुर्चीवरून थेट जमिनीवर कोसळते. सध्या या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, नवरी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून बसली आहे. तितक्यात नवरदेव नवरीला चकित करण्यासाठी गाणं लाऊन तिच्यासमोर नाचू लागतो. त्याचा डान्स नवरी देखील खाली बसून एन्जॉय करते. अशात नवरदेवाला मध्येच शायनींग मारावी वाटते आणि सगळीकडे त्याचं हसं होतं.

तो एका स्टेपमध्ये नवरीच्या डोक्यावरून पाय बाजूला घेत स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पठ्ठ्याची पँट टाईट असल्यानं पाय काय वर जातंच नाही. त्याचा पाय नवरीच्या चेहऱ्याला लागतो आणि ती खुर्चीसकट खाली पडते. अता या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.

एकाने यावर लिहिलं आहे की, पहिल्याच दिवशी याने माती खाल्ली, तर आणखीन एकाने लिहिलं आहे की, आता नवरदेवाची चांगलीच धुलाई होणार. सध्या या व्हिडिओची (Video) जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT