Arvind Kejriwal  Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal: मी 2 जूनला तुरुंगात जाण्यास तयार, सर्वोच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर केजरीवाल म्हणाले...

Arvind Kejriwal Bail Extension Plea: अरविंद केजरीवाल यांनी जामिनाची मुद्दत वाढवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला असून त्यांना आता 2 जूनला आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Satish Kengar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामिनाची मुद्दत वाढवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यानंतर आता केजरीवाल म्हणाले आहेत की, 2 जून रोजी ते तुरुंगात जाण्यास तयार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपण देशाला वाचवण्यासाठी तुरुंगात जात असून याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे. 21 दिवसांचा अंतरिम दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, केजरीवाल यांना 2 जूनला आत्मसमर्पण करावे लागेल.

केजरीवाल म्हणाले की, ''मी भ्रष्टाचार केला असे भाजपचे लोक म्हणत आहेत. मी भ्रष्ट असेल तर या जगात कोणीही प्रामाणिक नाही, असे लोक म्हणत आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. त्यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा दावा केला आणि 500 ​​ठिकाणी छापे टाकले. पण एक पैसाही वसूल झाला नाही.''

केजरीवाल म्हणाले की, अलीकडेच पंतप्रधानांना एका टीव्ही मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुमच्याकडे केजरीवाल यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. वसुली झाली नाही, मग त्यांना अटक का केली? आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे पंतप्रधानांनी मान्य केले. ते म्हणाले होते की, केजरीवाल हे अनुभवी चोर आहेत. आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याची कबुली पंतप्रधानांनी संपूर्ण देशासमोर दिली. म्हणजे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. मग त्यांनी मला अटक का केली? मी जे काम करू शकतो, ते मोदीजी करू शकत नाहीत. म्हणून अटक केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ''मी दिल्ली आणि पंजाबमधील लोकांना मोफत वीज दिली. मोदीजी हे करू शकत नाहीत. मी मुलांसाठी उत्कृष्ट सरकारी शाळा बांधल्या, मोदीजी हे करू शकत नाहीत. लोकांवर उपचार करण्यासाठी मी मोहल्ला क्लिनिक उघडले, मोदीजी हे करू शकत नाहीत. मी केलेले सर्व काम मोदीजी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना केजरीवाल यांना तुरुंगात टाकायचे आहे.''

दरम्यान, दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे 50 दिवस तिहार तुरुंगात घालवल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. त्याच्या जामिनाची मुदत 1 जून रोजी संपत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

Maharashtra Live News Update: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार हक्काचा निवारा

AI Love Story : तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी; 5 महिन्यांच्या डेटिंगनंतर गुपचूप उरकला साखरपुडा

Stomach Infection: पोटात इन्फेक्शन असेल तर दिसतात 'ही' लक्षणं

Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT