VIstara Airline Saam TV
देश विदेश

Emergency Landing : विमानात तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचा थरार; सर्व प्रवासी सुरक्षित

हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर परतले.

साम टिव्ही ब्युरो

Emergency Landing : दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानात सोमवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर दिल्ली IGI विमानतळावर संपूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली. DGCA ने सांगितले की हायड्रोलिक बिघाडामुळे एअर विस्तारा UK-781 फ्लाइटसाठी दिल्ली ते भुवनेश्वरला पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती.

हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे  विमान टेक ऑफ केल्यानंतर परतले. सायंकाळी 7.53 वाजता ही घटना घडली. फ्लाइट UK-781 ने 8.19 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 140 प्रवासी होते.

डीजीसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करताच विमानाच्या पायलटला विमानातील हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे समजले होते. पायलटने एटीसीला याची माहिती दिली, त्यानंतर दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी बोलावून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram New Feature: इन्स्टाचं भन्नाट फीचर! कोणत्या दिवशी कोणता रील पाहिला? यूजर्सला मिळणार A TO Z माहिती

Maharashtra Live News Update : शिवसैनिक हा सदैव तत्पर असतो तयार असतो; मंत्री संजय राठोड

Jalgaon News: कानाला हेडफोन अन् डोक्यात रील बनवण्याचं खूळ; रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट; दोन दिवसांच्या पावसामुळे चांदसैली घाटात कोसळली दरड

Tandulwadi Fort History: हिरवागार निसर्ग अन् ट्रेकिंगसाठी खास! तांदुळवाडी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

SCROLL FOR NEXT