Human Milk Saam tv
देश विदेश

Human Milk: आईचं दूध विकाल, तर जेलमध्ये जाल, FSSAI चा कडक कारवाईचा इशारा

FSSAI News: भारतात आईच्या दुधाची विक्री करण्यास बंदी आहे. मात्र आता याबाबत आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आईचं दूध विकल्यास थेट जेलची हवा खावी लागेल.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टिल्लू, साम टीव्ही, प्रतिनिधी

मानवी दुधाच्या व्यापारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आलीये.. भारतात आईच्या दुधाची विक्री करणं बेकायदेशीर आहे. मात्र छुप्या पद्धतीनं मानवी दुधाची विक्री होत असल्याचं समोर आलंय.. अशा प्रकारांना त्वरीत आळा घालण्याच्या सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI नं दिल्यात.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना स्पष्ट सूचना केल्या आहेत. मानवी दूध आणि त्यापासून तयार होणाऱ्या इतर उत्पादनांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांरव कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

FSSAI चे राज्यांना निर्देश

  • FSSAIची मानवी दूध विक्री आणि प्रक्रियेवर बंदी

  • राज्य-केंद्रशासित प्रदेशांना सूचना

  • दूध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक करावाईचा इशारा

  • दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईचे निर्देश

  • संबंधित दोषी संस्था,व्यक्तीचा परवाना रद्द करण्याचे निर्देश

आईचं दूध नवजात बालकासाठी अमृतासमान असतं,भारतात या दुधाच्या विक्रीवर बंदी आहेच. मात्र गेल्या काही वर्षात आईचं दूध विकण्याचा व्यापार फोफावलाय. त्यातून मिळणारं उत्पन्नही अधिक असल्यानं असे बेकायदा प्रकार सर्रास घडतात.मात्र आता या गोरखधंद्याला आळा बसेल अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: प्रतिक्षा संपली! लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचे ₹१५०० लवकरच मिळणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह

मराठेशाहीचा इतिहासकार हरपला; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन

Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Weather News : राज्यावर अवकाळीचे संकट कायम, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT