Video of Bengaluru girls fighting on street in school uniform emerges
Video of Bengaluru girls fighting on street in school uniform emerges Twitter/ @hasanadnanO1
देश विदेश

Bengaluru : शाळकरी मुलींच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; Video व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेंगळुरू: बेंगळुरूमधील (Bengaluru) एका शाळेसमोर मुलींच्या दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. शाळेच्या गणवेशात असलेल्या या शाळकरी मुली (School Girls) एकमेकांवर तुटून पडल्या (Fighting) आहे. ही घटना कधी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच भांडणाचे कारणही कळू शकलेले नाही. भर रस्त्यात ही हाणामारी झाल्याने तिथे मोठी गर्दी जमली होती. (Video of Bengaluru girls fighting on street in school uniform emerges)

पाहा व्हिडिओ -

फ्री स्टाईल हाणामारी करत असलेल्या या मुलींपैकी काही मुलींना त्याच्या गणवेशावरून ओळखण्यात आले. यात बेंगळुरूची प्रसिद्ध बिशप कॉटन गर्ल्स स्कूल या शाळेतल्या या विद्यर्थिनी असल्याचे समजते. या व्हिडिओत शाळकरी मुली एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तसेच एकमेकांच्या वेण्या आणि केसं ओढत ही हाणामारी सुरु होती. तर एका मुलीने हातात काठी घेतलेली दिसत आहे. ही हाणामारी झाली तेव्हा आजू-बाजूला काही मुलंही होती. काही लोकांनी त्यांना मारामारीपासून करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये एका मुलीला दुखापत झालेलीही दिसते.

ही मारामारी झाल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने या लढाईत हस्तक्षेप केला नाही किंवा कोणतेही विधान केले नाही. मात्र ट्विटरवर या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने "मुलगी शिकली, प्रगती झाली" अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एका यूजरने घोर कलयुग अशी कमेंट केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT