Vodaphone-Idea saam tv
देश विदेश

ग्राहकांसाठी खूषखबर! Vodafone फ्री मध्ये देणार Unlimited Calls, Data, SMS

वोडाफोन-आयडियाने ग्राहकांसाठी एक जबरदस्त नवा प्लॅन आणला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : स्मार्टफोन हा प्रत्येक माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोनमुळं (Mobile Smartphone) आताची पीढीही स्मार्ट होताना दिसत आहे. वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून ज्ञानात भर पाडून मोठ मोठे व्यवसाय सुरु करण्यातही अनेक लोक व्यग्र झाले आहेत. त्यामुळे विविध स्मार्टफोन्सच्या कंपन्याही आपल्या ग्राहंकांसाठी नेहमीच काहीना काही ऑफर्स (Recharge offers) देत असतात. जिओ कंपनीनं लॉंच झाल्यापासून ग्राहकांना स्वस्त आणि मस्त ऑफरही दिल्या. त्यामुळे जिओचा (jio) ग्राहकवर्गही मोठ्या प्रमाणात वाढला. स्मार्टफोनच्या दैनंदिन वापरात कमालीची वााढ होत असल्याने फोन कंपन्यांमध्येही वेगवेगळ्या ऑफर देण्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आता वोडाफोनने जिओ फोनच्या मार्गाप्रमाणेच जाण्याचा निर्णय घेतला आहे. वोडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन आणला आहे. हा असा प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना Unlimited Calls, Data आणि SMS ची सुविधा मोफत मिळणार आहे. फक्त तुम्हाला रिचार्ज करण्याआधी काही गोष्टी कराव्या लागतील. कारण हे सर्व प्लॅन पोस्टपेडसाठी उपलब्ध असणार आहेत.

Vodaphone फॅमिली प्लॅन

वोडाफोन-आयडियाने या सर्व प्लॅनला फॅमिली प्लॅन असं नाव दिलं आहे. ही सुविधा फक्त पोस्टपेडसाठी असल्याने तुम्हाला सुरुवातीला पैसे द्यावे लागणार नाहीत. फक्त प्लॅन निवडण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला Vodafone च्या 699 च्या प्लॅनबाबत माहिती देऊया. या पोस्टपेड प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला दोन कनेक्शनसाठी फायदा होणार आहे.

699 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला दोन्ही नंबरवर Unlimited calls ची सुविधा मिळते. त्याचसोबत प्रायमरी आणि सेकेंडरी अशा दोन्ही नंबरला 40-40 GB चा डेटाही दिला जातो. म्हणजेच एकूण 80 GB चा डेटा तु्म्ही वापरु शकता. तसंच याचसोबत तुम्हाला एका महिन्यासाठी 300 SMS आणि 200 GB रोल ओवर डेटाचीही लाभ मिळतो. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये OTT अॅप्लिकेशन्सचाही अॅक्सेस मिळतो. ZEE5 प्रमियम अॅक्सेसचीही या प्लॅनमध्ये सुविधा दिलीय.

999 प्लॅन

आता 999 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन कनेक्शनचा वापर करण्याची सुविधा मिळते. म्हणजेच एका प्लॅनचे पैसे दिल्यावर इतर २ वेगळ्या कनेक्शनचाही लाभ मिळतो. Unlimited Calls, 220GB Data आणि 3000 SMSस प्रति महिना हेच या प्लॅनचे खास वैशिष्ट्य आहे. तसंच 220 GB डेटा तिनही कनेक्शनला मिळणार आहे. प्रायमरी कनेक्शनसाठी 140 GB आणि इतर दोन कनेक्शनसाठी 40-40 GB डेटाच मिळणार आहे. या प्लॅनची खासीयत म्हणजे, या प्लॅनमध्ये प्रायमरी नंबरसाठी जास्त डेटासोबतच तिन कनेक्शनही दिलं जातं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT