डिटॉक्स ड्रिंक्स वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते का?

काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून तयार केलेले स्मूदी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Detox drinks in marathi, weight loss tips in marathi
Detox drinks in marathi, weight loss tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण जिम, योगा किंवा व्यायाम करतो. वजन कमी करण्यासाठी रोज व्यायाम करण्यासोबतच सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या मदतीने काही ड्रिंक्स किंवा आहार घेतो तरी देखील आपले वजन कमी होत नाही. परंतु, स्वयंपाकघरातील (Kitchen) काही पदार्थांचा आहारात समावेश करुन वजन नियंत्रणात आणू शकतो.

हे देखील पहा -

आपल्या आहारात आपण काही हेल्दी स्मूदीचाही समावेश करू शकता. विशेषत: काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून तयार केलेले स्मूदी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे पेय प्यायल्याने आपले पोट अधिक काळ भरलेले राहाते ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. उन्हाळ्यात काकडी आणि कोथिंबीर एकत्र करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोथिंबीरच्या सेवनाने आपले पोट थंड (Cold) राहाते. काकडीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही. त्‍यांच्‍या पानांपासून तयार स्मूदी शरीराला दीर्घकाळ हायड्रेट ठेवते. या स्मूदीमुळे आपली पचनक्रियाही चांगली राहते. काकडी आणि कोथिंबीर यांचे मिश्रण कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी मदत करते. रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील कॅलरी आणि चरबीचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होईल. परंतु डिटॉक्स ड्रिंक्स कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

Detox drinks in marathi, weight loss tips in marathi
उन्हाळ्यातून घराबाहेर जाण्याआधी या पदार्थांचे सेवन करा !

डिटॉक्स ड्रिंक्स असे तयार करा.

साहित्य-

२ काकडी,

एक वाटी कोथिंबीर,

चवीनुसार मीठ,

चिमूटभर काळी मिरी.

कृती -

सर्वप्रथम काकडी नीट धुवून कापून घ्या. मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यात कोथिंबीर आणि काकडी टाका. त्यानंतर ते चांगले बारीक वाटून घ्या. तयार पेय ग्लास घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. जर आपण याचे रोज सेवन केले तर आपले वजन नियंत्रणात राहिल

या पेयाचे नियमित सेवन करुन आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com