Cattle stand inside a restricted zone in southwest France after authorities imposed an animal lockdown to curb the spread of Lumpy Skin Disease. Saam Tv
देश विदेश

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश आजाराचा कहर, लंपीमुळे 3 हजार गायींचा मृत्यू

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश्य आजारानं कहर केलाय. त्यामुळे देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात ऍनिमल लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या विषाणूजन्य आजारामुळे फ्रान्स सरकारचं टेन्शन वाढलंय. तर अनेक भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायेत.

Omkar Sonawane

फ्रान्समध्ये कोराना सदृश्य आजाराने कहर केलाय. लंपी स्किन डिसीज हा आजार गाय आणि बैलांमध्ये वेगानं पसरतोय. या आजारानं आतापर्यंत 3 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतलाय. त्यामुळे फ्रान्सच्या दक्षिण-पश्चिम भागात अ‍ॅनिमल लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या विषाणूजन्य आजारामुळे फ्रान्स सरकारही चिंतेत सापडलंय. अनेक भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायेत. सरकार या आजारावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवू शकत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.दरम्यान, ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलंय.

लंपी स्किन डिसीज म्हणजे काय?

लंपी स्किन डिसीज हा आजार कॅप्रीप्रॉक्स या विषाणूमुळे होतो. हा विषाणू डास किंवा रक्त शोषणाऱ्या इतर कीटकांद्वारे जनावरांमध्ये पसरतो. विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर 5 ते 28 दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात. या आजारावर तात्काळ उपचार उपलब्ध नाहीत, मात्र लसीकरणाद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येते. फ्रान्स सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 लाख गायींना लस देण्यात आलीय.

फ्रान्समध्ये लंपी स्किन डिसीज गायींमध्ये झपाट्यानं पसरतोय. जुलै 2025 पासून आतापर्यंत सुमारे 3 हजार गायींचा मृत्यू झालाय. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्रान्स सरकारनं अ‍ॅनिमल लॉकडाऊन लागू केलाय.

सरकारी धोरणावर शेतकरी नाराज

ऍनिमल लॉकडाऊन अंतर्गत एखादी गाय संक्रमित आढळली, तर त्या परिसरातील सर्व गायी मारल्या जातील. सरकारने याला ‘इच्छामृत्यू’ असं नाव दिलय. लंपी स्किन डिसीजचा प्रसार रोखण्यासाठी पशुधनाच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गायींची खरेदी-विक्री करता येत नाही. लसीकरणासंदर्भात सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही. सरकारनुसार, संक्रमित भागाच्या 50 किलोमीटर परिसरात आपत्कालीन लसीकरण केले जातय, मात्र या धोरणावरून शेतकरी नाराज आहेत.

गायींमध्ये पसरणारा आजार रोखण्यासाठी फ्रान्स सरकारने कडक पावलं उचलली आहेत. मात्र त्यातूनही या आजाराने देशाची सीमारेषा ओलांडली तर जगाला पुन्हा नव्या संकटाला सामोरं जावं लागेल. हेही तितकच खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

ठाण्यात शिंदेसेनेत नाराजीनाट्य, मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, शिंदेसेनेत अस्वस्थता

राष्ट्रवादी विलिनीकरणाला सुरूवात? महापालिका निमित्त, त्यानंतर कायमचं एकत्र?

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, रविवारी प्रवाशांचा खोळंबा होणार; कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

Maharashtra Politics: पुण्यात महायुतीत धुसफूस, शिंदेसेनेत नाराजीनाट्याला सुरुवात

SCROLL FOR NEXT