Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. भरधाव कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये कार आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात

  • लखनऊ-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात

  • कार ट्रॅक्टरखाली घुसल्याने चार तरुणांचा मृत्यू

  • नैनीतालच्या तरुणांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. या अपघातामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण कारने दिल्लीला जात होते. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-दिल्ली नॅशनल हायवेवर हा अपघात झाला. कार रामपूरवरून दिल्लीला जात होती. भरधाव कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. कार ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली घुसली. या अपघातामध्ये ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व तरूण नैनीताल जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातामुळे तरुण राहत असलेल्या नैनीताल येथील परिसरात शोककळा पसरली.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मूंढापांडे क्षेत्रातील मनकरा वळणावर भरधाव कारने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. कार थेट ट्रॅक्टरखाली घुसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. कारमधील पाचही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ मूंढापांडे सीएचसी रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी चार तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

अपघातामध्ये जखमी झालेल्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये द्याल रावत, अनिल नेगी, सुंदर सैनी, भुवन भंडारी या चौघांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये यशदीप पांडे हा कारचालक गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Shortage: टंचाई नाही मग रांगा का? सिलिंडरच्या टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा भडका

सरकारी बसमध्ये तृतीयपंथींना मोफत प्रवास, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

धक्कादायक! हॉस्पिटलमधील आयसीयूत उंदीर चावलेल्या महिलेचा मृत्यू

Battle Of Galwan New Title: 'बॅटल ऑफ गलवान'चं नाव बदललं; सलमान खानचा चित्रपट आता 'या' नावाने होणार प्रदर्शित

Maharashtra Live News Update: नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

SCROLL FOR NEXT