ishq karo party Saam tv
देश विदेश

भारताच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी केली घोषणा

ishq karo party : भारताच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी घोषणा केली.

Vishal Gangurde

सोशल मीडियावर सीजीपीचे जोरदार चर्चा

कॉकरोज जनता पक्षाच्य विरोधात नवा पक्ष स्थापन

सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी काढला नवा पक्ष

सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा आहे. आता कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात आणखी पक्षाने एन्ट्री मारली आहे. 'इश्क करो पार्टी' असे डिजिटल पक्षाचे नाव आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कण्डेय काटजू यांनी 'एक्स'वर पोस्ट करत नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी पोस्ट करत तरुणांना सामील होण्याचे आवाहन केलं आहे.

माजी न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे की, नवा पक्षात युद्ध, द्वेषाला थारा नसेल. प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाची स्थापन केली आहे. पक्षात युवकांनी सामील होण्यासाठी काटजू यांनी अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये म्हटलं की, ' ज्या लोकांना 'इश्क करो पार्टी'त सहभागी व्हायचं आहे. त्यांचा मी संरक्षक असेल. तुम्ही Ishqkaroparty@gmai.com वर संपर्क करू शकतात.

काटजू यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, अनेकांना हा उपक्रम मस्करी वाटत आहे, परंतु त्यांचा गैरसमज झाला आहे. काही लोकांन वाटत असेल, 'इश्क करो पार्टी' म्हणजे कोणतीही मस्करी नाही. तरुण-तरुणींच्या प्रेमसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हॅलेंटाइन डे सारखा उपक्रम असल्याचे वाटत असेल. परंतु हा एक गैरसमज आहे'.

'भारतासमोर असलेल्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याचा एक गंभीर प्रयत्न आहे. भारत गरीबी, बेरोजगारी,लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे त्रस्त आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतातील प्रत्येक दुसरा मुलगा कुपोषित आहे. मागील काही वर्षांत स्थिती घराब झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वाणवा पाहायला मिळत आहे . भारतात जातीय-धार्मिक तेढ सारख्या अनेक गंभीर समस्या देखील आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.

'भारतातील महत्त्वाच्या समस्या अद्याप मिटवण्यात आलेल्या नाहीत. लोकांधमेध्ये एकता नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील. काही स्वार्थी नेते जातीय-धार्मिक वादाला प्रोत्साहन देतान दिसत आहे. जाती , धर्म आणि भाषेमुळे समाज विभागला आहे. राजकीय नेते केवळ व्होट बँकेच्या राजकारण करत आहेत. 'इश्क करो पार्टी' हा पक्ष भारतीयांना मार्गदर्शन करेल. हेच पक्षाचे उद्दिष्टे आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT