Police conduct a raid at a high-profile farmhouse drug party in Hyderabad where a former Rajasthan MLA allegedly tested positive for cocaine. Saam Tv
देश विदेश

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

Former Rajasthan MLA Cocaine Positive In Hyderabad Drug Party: हैदराबादमधील एका हाय प्रोफाइल फार्महाऊस ड्रग पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठा भंडाफोड केला. या कारवाईत राजस्थानचे माजी आमदार कोकिन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

पोलिसांच्या अॅंटी नार्कोटिक्स विभागाने मोठी कारवाई केली असून एका हाय प्रोफाइल ड्रग पार्टीचा भंडाफोड केला आहे. या कारवाईमुळे राजस्थानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या 10 लोकांपैकी एक जण हे राजस्थानचे माजी आमदार आहेत. हैदराबाद येथेल एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये शनिवारी सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीमध्ये राजस्थानमधील एक राजकीय व्यक्तीला अटक केली आहे. तेलंगणा पोलिसांनी BRS चे माजी आमदार पायलट रोहित रेड्डीच्या फार्महाऊसवर छापा टाकला, यामध्ये राजस्थानचे माजी आमदाराला ड्रग्स घेताना रंगेहाथ पकडले आहे. रिपोर्टनुसार राजस्थानचे माजी आमदार मेडिकल टेस्टमध्ये कोकीन पॉझिटिव्ह आढळले आहे.

राजस्थानचे माजी आमदार कोकिन टेस्टमध्ये 'पॉझिटिव्ह' अन् राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यानंतर सर्व १० संशयितांची स्थानिक सरकारी रुग्णालयात अंमली पदार्थविरोधी चाचणी करण्यात आली. राजस्थानचे माजी आमदार (नाव अद्याप जाहीर केलेले नाही) आणि बीआरएस नेते रोहित रेड्डी यांच्या शरीरात कोकेनचे अंश आढळले. मात्र आंध्र प्रदेशातील टीडीपी खासदार पुट्टा महेश यादव यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पोलिस आता राजस्थानच्या नेत्याचा ड्रग्ज नेटवर्कशी सहभाग आणि संबंध तपासत आहेत.

हा छापा एखाद्या थरारक चित्रपटापेक्षा कमी नव्हता. शनिवारी रात्री ९:३० च्या सुमारास पोलिसांच्या पथकाने फार्महाऊसवर धाड टाकली तेव्हा सुरक्षा कर्मचारी आणि स्वतः रोहित रेड्डी यांनी पथकाला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस आत येताच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हवेत दोनवेळा गोळीबार केला. ही बंदूक रोहित रेड्डी यांच्या भावाचे असल्याचे सांगितले जात आहे.परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून, ईगल पथकाने 'फ्यूचर सिटी'च्या (SOT) पथकाला पाचारण केले त्यानंतर पोलिसांनी भिंतीवरून उडी मारून दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

फार्महाऊसमधील व्हिडिओ हे खळबळ उडवून देणारी असून पोलिसांनी 2 ग्राम कोकिन आणि इतर अमली पदार्थ जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये राजस्थान, दिल्ली आणि तेलंगनामधील मोठे बिल्डर्स, राजकीय नेते आणि एक महिलेचा देखील समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, ही पार्टी खूपवेळापासून सुरू होती, आणि देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून लोक इथे आलेली होती. राजस्थानच्या या माजी आमदाराच्या (सुरक्षेच्या कारणास्तव आणि चालू तपासामुळे ज्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही) उपस्थितीने राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गुप्तचर संस्था आता या प्रकरणात राजस्थानमधील इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. ड्रग्जची खेप राजस्थानमार्गे येथे पोहोचली का? याचा देखील तपास करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT