मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान, अर्थमंत्री, आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केले होते. त्यांनी देशाला अनेकदा आर्थिकदृष्ट्या सावरले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखरेचा निरोप देण्यात येत आहेत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंसाकर होत आहे. तिन्ही दलाकडून अखरेची सलामी देण्यात आली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरची मानवंदना देण्यात येत आहे.
मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित झाले आहे. ते आता मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतील.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
अमित शाह निगम बोध घाटावर आले आहेत. ते मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत.
जे पी नड्डा हे मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले आहेत. ते निगम बोध घाट येथे उपस्थित राहणार आहेत.
मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यावेळी फक्त भारतासाठी नाही तर जगभरात आज दुःखाचा दिवस, असं काँग्रेस नेते मनिष तेवारी यांनी म्हटले आहे.
मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघाली आहे. त्यांचे पार्थिव निगम बोध घाटच्या दिशेने रवाना झाले आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आहे. यावेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आदरांजली वाहिली आहे.
काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात मनमोहन सिंग यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले आहे. त्यांची बायको गुरशन कौर आणि लेक दमन सिंग यांनी त्यांना आंदराजली वाहिली आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात नेण्यात आले आहेत. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
काँग्रेसचे नेते प्रताप सिंग यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशाला वाटतंय की,जिथे मनमहन सिंग यांचे स्मारक बांधणार तिथेच अंत्यसंस्कार करावे
मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. ८.३० वाजता त्यांचे पार्थिक कार्यालयात आणण्यात येणार आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आज सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. दिल्लीच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान एम्युन्युएल मॅक्रॉन यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते खूप चांगले व्यक्तीमत्त्व होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम केले आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल दिल्ली येथे निधन झाले. त्यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच यावेळी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात त्यापैकी मनमोहन सिंग होते असे उदगार अण्णांनी काढले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची आणि माझी अनेक वेळा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटले अशा भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या आहे. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होता नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात जातात मात्र एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
बाईट - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. पंजाबचे मुख्यमंत्री गुरजीत सिंग अहुजा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. देश त्यांना कधीच विसरणार नाही. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप काम केले, असं त्यांनी म्हटलं आहे.
पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक झाली. या बेठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली दिली गेली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.त्यांच्या कुटुंबाला या काळात उभं राहण्याची ताकद देवो, असं त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मनमोहन सिंग यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले. मनमोहन सिंग आणि आमचे संबंध मुंबईपासून होते. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा ते आरबीआय गव्हर्नर होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत जेव्हा गडबड झाली तेव्हा त्यांनी सांभाळून देशाला पुढे नेले,असं ते म्हणाले
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला अनेक नेते येत आहेत. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आणले जाणार आहे. काँग्रेसचे अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रियंका गांधी निवासस्थानी पोहचल्या आहेत.
* देशातील मोठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेला आहे.. ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देऊन अर्थकारण सूव्यवस्थित आणलं होतं.. मंदीच्या काळात अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती..
* प्रत्येक राजकीय लोकांशी स्लोकेशी संबंध अस, देशासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचल आणि देशभक्तीसाठी काम करणारा मोठा नेता आपल्यातून गेला आहे...
* इकॉनोमी विषय आल्यानंतर मनमोहन सिंग यांचं नाव देशात कधीच लपून राहू शकत नाही...
* एवढं मोठं योगदान आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा होतं...
* अर्थमंत्री पंतप्रधान म्हणून केलेली कामगिरी चिरंतर लक्षात राहील..
* अशा नेत्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो..
संजय राऊत
* डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालं ही देशाचे हानी
* आपले अर्थव्यवस्था दहा वर्षात इतके उपाध्यक्ष देखील करून देखील टिकून आहे
* सध्याच्या सरकारने एवढे सुरुग लावले तरी ते टिकून आहे याचा सर्व श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना जाते
* विरोधी पक्ष नेते म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला दिलेल्या इचारे अर्थशास्त्रज्ञ म्हणून खरे ठरले
* नोटाबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले
* सोळा दिवस पुरेल इतका पैसे असताना नरसिंहराव यांनी अर्थशास्त्र त्यांना दिला होत
* आज नरेंद्र मोदी हे फुकट धान्य देत आहेत कोणीही उपाशी राहणार नाही प्रत्येकाच्या घरात चूल पेटते ही योजना मनमोहन सिंग यांची आहे अन्नसुरक्षा कायदा हे त्यांनी आणला
* असे अनेक योजना त्याने देशाच्या जनतेसाठी आणली
* अत्यंत प्रामाणिक आणि त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला
* मुंबईचा विशेष त्यांच्या प्रेम होतं त्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलं
* जे आता मेट्रो दिसत आहे त्याचा श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन पहिला उद्घाटन त्यांनी केलं होतं
* आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंट त्यांच्याशी आमच्या संवाद राहिला विरोधी पक्षात आले तेव्हाही आमचा संवाद राहिला
* हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते
* कोणाचाही जाती-धर्माचा अधिवेश न करणारा त्यांचं काम आहे अत्यंत दुखत आहे
* त्यांनी कोणाशी संवाद तोडला नाही 250 च्या वर पत्रकार परिषद घेतल्या कोणत्याही प्रधानमंत्री यांनी घेतल्या नाही नरेंद्र मोदी यांनी देखील नाही
* पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले कोणत्याही प्रश्नांपासून पळून गेले आहे
* काँग्रेस पक्षाच्या वालीमध्ये देखील त्यांचे योगदान
* त्यांचे स्मरण या देशाला कायम राहील कारण संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचा काम त्यांनी केलं
* ते संसदेत यायचे प्रधानमंत्री म्हणून आणि फार मोकळेपणाने वागायचे
* प्रत्येक वेळेला ठाकरेजी कैसे हे आणि उद्धवजी कसे आहेत विचारायचे
* इतका मोठा माणूस आम्हाला ओळखतो की नाही हे आम्ही समोर गेलो की आम्हाला नावाने ओळखायचे
* या पृथ्वी तलावावर तो देवदूत होता
पंतप्रधान मोदींना मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली आहे. अमित शाह यांनीदेखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- आज संपूर्ण देशात दुःखाची लाट आहे.. सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. मनमोहन सिंग यांनी आर्थिक घडी बवसली. संवेदनशील शांतपणे स्थान मनमोहन सिंग यांनी केल.
- भाजपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. ही पोकळी न भरून निघणारी आहे.
- विकसित भारताला पुढे नेण्याचं काम मोदी जी करत आहे. मनमोहन सिंग यांच्या राजकीय प्रवास, आणि देशासाठी ठेवी असलेली आहे, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री भाजप
मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अत्यंसंस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- संकट काळात देश उभा करण्यात सिंहाचा वाटा त्यांचा होता,
- देश आर्थिक संकटात असताना त्यांनी बाहेर काढण्याच काम केलं,
- अत्यंत संयमी प्रामाणिकपणा मृद भाषी ते होते. बोलत नाहीत असे आरोप असताना बोलण्यापेक्षा काम करणारे अशी त्यांची ओळख होती.
- अनेक महत्वाचे निर्णय योजना त्यांनी राबवल्या होत्या..
- IT क्षेत्रातील भारत उभा झाला, त्याची कामगिरी मोठी होती,
- आर्थिक स्थिरता देणारा आधारस्तंभ, आर्थिक सुब्बता देणारा नेत्याला आम्ही सर्व जण मुकले, मोठी पोकळी देशात आणि काँग्रेस पक्षात निर्माण झाली,
- कोल scam spectrum असे आरोप झाले, सायंक ढळू दिला नाही, त्यांनी त्याचा कार्यातून उत्तर दिलं, स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक असा राजकारणी महान व्यक्ती या देशातून हरपली आहे
- ते वर्धा जिल्ह्यात आले परिस्थिती पाहून आश्वासन दिले, त्यावेळी देशातील शेतकऱ्यांचा सरसकट 72 हजात कोटींचा कर्ज माफ केले, विदर्भासाठी फार मोठं काम केलं,
- बंद पडलेला गोसेखुर्द प्रकल्पाला निधी दिला, राज्यमंत्री असताना निधी उपलंध करून दिला,
- 4990 कोटी गोसेखुर्दला दिला, राष्ट्रीय प्रकल्प घोषित केला...
काल देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले. त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जाणार आहेत.
अजित पवारांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया मनमोहन सिंग यांनी रचला, असं म्हणत त्यांना आदरांजली वाहिली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपती भवनावरील राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला आहे.
काल रात्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केली आहे. अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमचे आणि मनमोहन सिंग यांचे चांगले संबंध होते, असं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
भारतीय खेळाडूंनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिती आहे. ते आपल्या खांद्याला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या चौथ्या टेस्ट मॅचसाठी आज ते मैदानात उतरले आहेत.
देशाचे माजी प्रंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. त्यामुळे देशभरात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सर्व सरकारी कामे रद्द करण्यात आली आहेत.
काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ही खूप दुःखद स्थिती आहे.डॉ. मनमोहन सिंग देशाचे आणि काँग्रेसचे प्रतिक होते. स्वातंत्र्यानंतर ते देशाचे नायक होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी होणार अंत्यसंस्कार
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन
एम्स रुग्णालयामध्ये गुरूवारी रात्री घेतला अखेरचा श्वास
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी होणार अंत्यसंस्कार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.