Accident CCTV Footage  Saam Tv
देश विदेश

CCTV Footage : माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कार अपघाताचा VIDEO आला समोर, अपघातात पत्नीचा मृत्यू

प्रविण वाकचौरे

Accident CCTV News :

माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये कारचा अपघात कसा झाला हे दिसत आहे. मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला होता. मानवेंद्र सिंह यांच्यासोबत त्यांचा मुलगा हमीर सिंग आणि ड्रायव्हर होते. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अपघाताचा थरार कैद झाला आहे. कारचा वेग ताशी 200 किमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भरधाव वेगात कार महामार्गावरून खाली गेल्याचे आणि दुभाजक ओलांडून अंडरपासच्या भिंतीला धडकल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. (Latest Marathi News)

मंगळवारी संध्याकाळी मानवेंद्र सिंह यांचे कुटुंब दिल्लीहून जयपूरला येत होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या रसगनच्या खुसपुरी गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या दोन्ही बरगड्या तुटल्या असून त्यांच्या मुलाचा हात व नाक फ्रॅक्चर झाले आहे.

दोघांनाही मंगळवारी रात्रीच गुरुग्राम येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघातानंतर मानवेंद्र यांच्या पत्नी चित्रा सिंह जिथे बसल्या होत्या तिथे मागील एअर बॅग उघडू शकल्या नाहीत.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मागील बाजूस दाब नसल्यामुळे सेन्सर्सने काम केलं नाही आणि एअर बॅग उघडू शकल्या नाहीत. चित्रा सिंह मागे बसल्या होत्या, त्यामुळे एअर बॅग न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

SCROLL FOR NEXT