Champai Soren: कोण आहेत झारखंडचे नवीन मुख्यमंत्री चंपई सोरेन? जाणून घ्या राजकीय कारकिर्द

who is Champai Soren:गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, हेमंत सोरेन यांच्या जागी आता चंपाई सोरेन मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळणार आहेत.
Champai Soren
Champai SorenGoogle
Published On

Jharkhand New CM :

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, हेमंत सोरेन यांच्या जागी आता चंपाई सोरेन मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळणार आहेत. चंपाई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होताच देशभर चर्चेत आले आहेत. झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

कशी आहे चंपाई सोरेन यांची राजकीय कारकिर्द?

चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्च्याचे वरिष्ठ नेते आहेत. चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. चंपाई सोरेन यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे.

हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातही चंपाई सोरेन यांचा सामावेश होता. त्यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी होती. तर याआधी अर्जुन मुंडा सरकारच्या कार्यकाळातही त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे.

चंपाई सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील वरिष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. चंपाई हे झारखंडमध्ये 'टायगर' नावानेही ओळखले जातात.

दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या राजीनामा आणि ईडीकडून अटक केल्यानंतर झारखंडचं मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल झारखंडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. या चर्चेत कल्पना सोरेन आणि चंपाई सोरेन यांचं नाव आघाडीवर होतं. झारखंडच्या राजकारणात चंपाई सोरेन यांचं राजकीय वजन अधिक आहे . यामुळे चंपाई सोरेने यांना झारखंडचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com