Navneet Rana  Saam tv
देश विदेश

Navneet Rana : हिंदू वाघीण...तू आता काही दिवसांची पाहुणी; नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

Navneet Rana News : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी मिळाली आहे. फोनवरून त्यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

भाजप आणि पाकिस्तानदरम्यान तणाव कायम आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशातील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरु आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर त्यांचे ३५ सैनिक मारले गेले. दोन्ही देशातील तणावादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनीत राणा यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. 'हिंदू वाघीण...तू काही दिवसांची पाहुणी आहे. तुला लवकरच संपवू. आता सिंदूर आणि सिंदूर लावणारी देखील वाचणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. माजी खासदाराला वेगवेगळ्या क्रमाकांवरून धमकी मिळाली आहे.

पाकिस्तानातून फोन आल्यानंतर नवनीत राणा यांनी खार पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. नवनीत राणा यांना याआधी देखील धमक्या मिळाल्या आहेत. नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आक्रमक विधाने केली होती.

नवनीत राणा यांनी म्हटलं होतं की, 'त्यांनी घरात घुसून मारलं, आता त्यांचासाठी स्मशानात खड्डा खोदला आहे. देशाच्या गादीवर तुमचा बाप बसला आहे'. सोशल मीडियावरूनही त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. 'सिंदूरचा बदला सिंदूरने घेऊ. जय हिंद, जय भारत, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.

भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी ४ दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर १७ पर्यटक जखमी झाले होते. यानंतर भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला होता. एअर स्ट्राइकच्या हल्ल्यात १०० हून अधिक जणांचा खात्मा झाला. हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केला. एलओसीजवळून काही राज्यात ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. मात्र, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे ड्रोन पाडले.

कोण आहेत नवनीत राणा?

नवनीत राणा २०१९ साली महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ साली राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना धूळ चारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT