Goa Former MLA Lavoo Mamledar Dies SaamTv
देश विदेश

Former MLA Lavoo Mamledar Dies : बाहेर जाताना रिक्षाला कट, माजी आमदाराला बेदम मारहाण, काही क्षणात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Goa Former MLA Lavoo Mamledar Dies : लॉजचे चालक आणि इतर लोक मारहाणीचा प्रकार पाहून तिथे पोहोचले. त्यांनी रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मारहाण सुरूच ठेवली. जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर ते लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

Prashant Patil

पणजी : माजी आमदार लहू मामलेदार (वय ६९) यांचा रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीनंतर लॉजच्या पायऱ्या चढताना कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मामलेदार २०१२ ते २०१७ या काळात आमदार होते. बेळगावमधील खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ ही घटना घडली. लहू मामलेदार हे गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लहू मामलेदार कामानिमित्त बेळगावला आले होते. खडेबाजारमधील शिवानंद लॉजमध्ये जात असताना त्यांच्या गाडीचा एका रिक्षाला स्पर्श झाला. या घटनेत रिक्षाचे काहीही नुकसान झाले नाही, त्यामुळे मामलेदार यांनी ‘सॉरी’ म्हटले आणि ते गाडी घेऊन पुढे निघाले. लॉजसमोर गाडी उभी करत असतानाच रिक्षाचालक तिथे आला. त्याने लहू मामलेदार गाडीतून उतरताच त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांना बेदम मारहाण केली.

लॉजचे चालक आणि इतर लोक मारहाणीचा प्रकार पाहून तिथे पोहोचले. त्यांनी रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मारहाण सुरूच ठेवली. जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर ते लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षाचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल.

लहू मामलेदार २०१२ ते २०१७ या काळात गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. २०१७च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी पक्ष सोडला. जानेवारी २०२२ मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT