Shivdeep Lande Saam Tv
देश विदेश

Shivdeep Lande: महाराष्ट्रात सासरे तर बिहारमध्ये जावई; माजी IPS शिवदीप लांडेंची राजकारणात एन्ट्री

Shivdeep Lande Entry In Bihar Election: महाराष्ट्राचे सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी बिहारच्या राजकारणात एन्ट्री घेतलीये. त्यांनी स्वतः चा नवीन पक्ष स्थापन केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे सिंघम अशी ओळख असलेले आणि आमदार विजय शिवतारेंचे जावई शिवदीप लांडेंनी बिहारच्या निवडणूकीत एन्ट्री केलीय. त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे याबाबत सविस्तर जाणून घ्या.

महाराष्ट्राचा सिंघम लढवणार बिहारची निवडणूक

महाराष्ट्राचे सिंघम शिवदीप लांडे यांनी राजकारणात एन्ट्री घेतलीये. ज्यांचं नाव ऐकून बिहारमधील गुन्हेगार चळाचळा कापत होते.. त्याच बिहारमध्ये हिंद सेना नावाचा पक्ष काढत शिवदीप लांडेंनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकलाय.

गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे महाराष्ट्राचे सिंघम शिवदीप लांडे कोण आहेत?

2006- भारतीय पोलीस सेवेत निवड

पहिलीच पोस्टिंग बिहारच्या नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यात

पाटण्यात महिलांच्या छेडछाडीविरोधात कठोर पावलं, जनमानसात लोकप्रिय

मुंबईत दहशतवादी विरोधी पथकात डीआयजी म्हणून काम

बिहारच्या पूर्णिया रेंजचे महासंचालकपद

अकोल्यात गरीब मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी काम

19 सप्टेंबर 2024- शिवदीप लांडेंचा आयपीएस पदाचा राजीनामा

शिवदीप लांडेंनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपण बिहारमध्येच काम करणार हे जाहीर केलं. त्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती.. मात्र आता विजय शिवतारेंचे जावई असलेल्या शिवदीप लांडेंनी वेगळी चूल मांडलीय.. तर बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ प्रशासन देण्याचा दावा लांडेंनी केलाय.. मात्र बिहारच्या राजकारणात विकास आणि स्वच्छ प्रशासनाच्या कितीही वल्गना केल्या तरी अंतिम सुई जातीय राजकारणावर येऊन थांबते.. त्यामुळे बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे शिवदीप लांडे बिहारचं मैदान मारणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT