Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता सनी देओलने अभिनयासोबतच राजकारणातही प्रेवश केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओलने राजकारण सोडले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सनी देओलला अभिनय आणि राजकीय कारकिर्दीत समतोल कसा साधतो? असा प्रश्न केला.
प्रश्नावर उत्तर देत सनी देओल म्हणाला की, "समतोल राखता न आल्यामुळे मी राजकारणापासून दूर झालो आहे."
यासंबंधित तो पुढे म्हणाला, "प्रत्येक व्यक्तीची मर्यादा असते. म्हणून मी जिथे सुरुवात केली तिथेच परत आलो आहे."
सनी देओल लवकरच 'जाट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'जाट' चित्रपट 10 एप्रिलला रिलीज होणार आहे.
'जाट' मध्ये सनी देओल ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे.