Former Deridder Mayor Misty Roberts found guilty in minor sexual misconduct case; faces potential 10-year prison sentence. Saam Tv
देश विदेश

माजी महापौराचे १६ वर्षांच्या मुलासोबत शरीरसंबंध; कोर्टाने ठरवले दोषी, राजकीय वर्तुळात खळबळ

Former Deridder Mayor Misty Roberts Guilty Verdict Details: राज्यातील माजी महापौर मिस्टी रॉबर्ट्स यांना १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले.

Omkar Sonawane

घरी पूल पार्टीच्या बहाण्याने बोलावून १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेच्या लुईझियाना येथील ४३ वर्षीय माजी महापौर मिस्टी रॉबर्ट्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. रॉबर्ट्सवर अल्पवयीन मुलाकडून 'गर्भनिरोधक गोळ्या' मागवल्याचाही आरोप होता. मिस्टी रॉबर्ट्स ही डेरिडरच्या महापौर म्हणून आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण करत असतानाच या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. जुलै २०२४ च्या शेवटी तिने अचानक राजीनामा दिला आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

Former Deridder mayor Misty Roberts guilty verdict details

१० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची शक्यता

ज्या आरोपांत मिस्टी रॉबर्ट्सला दोषी ठरवण्यात आले आहे, त्यात तिला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. डेरिडर नगरपालिकेत मंगळवारी एका ज्युरीने त्यांना दोन गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले

१. अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवणे.

२. अल्पवयीन मुलासोबत अश्लील वर्तन करणे.

पोलिस तपासात असे समोर आले आहे की, शरीरसंबंध ठेवल्यानंतर ती मुलाचे शोषण करू लागल्या होत्या.

पीडित मुलाचे गंभीर आरोप

खटल्याच्या शेवटच्या दिवशी पीडित मुलाने साक्ष दिली की, जास्त दारू पिल्यामुळे त्याला उलट्या होत असतानाही मिस्टी रॉबर्ट्स हिने पूलजवळ त्याच्यासोबत छेडछाड केली आणि त्याला किस करण्यास सुरुवात केली. स्थानिक वृत्तवाहिनी केपीएलसीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने सांगितले की, तो शारीरिक संबंधांसाठी संमती देण्याच्या कायदेशीर वयाचा नव्हता, तरीही रॉबर्ट्स त्याला वरच्या खोलीत घेऊन गेली आणि त्याच्यावर अत्याचार केला.

स्वतःच्या मुलांनी दिली साक्ष

या प्रकरणात मिस्टी रॉबर्ट्सची दोन मुले आणि पुतण्यानेही साक्ष दिली. त्यांनी रॉबर्ट्स आणि पीडित मुलाला एकत्र पाहिले होते, मात्र अत्याचार होताना त्यांनी पाहिले नव्हते. अहवालानुसार, पीडित मुलाने रॉबर्ट्सला त्यांच्या मुलाशी वाद घालताना आणि ओरडताना ऐकले होते, ज्यामध्ये ती मुलाला दोष देत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात थरारक दुहेरी मृत्यू; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती महिन्याचे पैसे जमा, वाचा महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT