FORMER BJP LEADER CHHOTELAL PASWAN DIES IN GORAKHPUR JAIL AT 58 saam tv
देश विदेश

ऐन दिवाळीत भाजपच्या बड्या नेत्याचे जेलमध्ये निधन; राजकारणात शोककळा

Former BJP Mandal President Chhotelal Paswan Death News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा कारागृहात बंद असलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष छोटेलाल पासवान यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा कारागृहात बंद असलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष छोटेलाल पासवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते. गुरुवारी बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छोटेलाल पासवान हे खोराबार गावचे रहिवासी होते. त्यांनी भाजपचे खोराबार मंडळ अध्यक्ष तसेच प्रधान संघाचे मंडळ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. 2004 मध्ये दाखल झालेल्या हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल घडवण्याच्या प्रकरणात न्यायालयाने 25 जुलै 2024 रोजी त्यांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे कुटुंब देखील रुग्णालयात उपस्थित होते.

जेल अधीक्षक दिलीप पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटेलाल पासवान यांची जेलमध्ये येण्याआधीच प्रकृती खराब होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: डायट केलं नाही, फक्त एक गोष्ट खायची सोडली अन् प्रसिद्ध मॉडेलचं वजन ३६ किलो झालं कमी

Maharashtra News Live Update: मंत्री भरत गोगावले यांनी अधिकाऱ्यांसह घेतला शेतावर जेवणाचा आनंद

CT Scan, MRI आणि X-Ray यांच्यात नेमका फरक काय?

Train Fire: धावत्या ट्रेनला भीषण आग, 4 डबे जळून खाक; प्रवाश्यांनी घाबरून खाली उड्या मारल्या

High Court : कौटुंबिक वाद म्हणजे क्रूरता नाही! हाय कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT