Nikhil Kamath
Nikhil Kamath Saam TV
देश विदेश

Nikhil Kamath in Forbes List: कधी काळी फक्त ८ हजार रुपये पगाराची नोकरी, आता झाला भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश

साम टिव्ही ब्युरो

Nikhil Kamath News : फोर्ब्सने जगभरातील श्रीमंताची 2023 ची यादी जारी केली केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहे. या यादीत एकूण 169 भारतीयांचा समावेश आहे. गेल्यावर्षी ही संख्या 166 होती. तर या यादीत Zeerodha चे संस्थापक, मालक निखिल कामत यांनी देखील स्थान मिळवलं आहे.

झीरोधाचे मालक निखील कामथ भारतीय अब्जाधीशांपैकी सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. निखील कामथ यांनी मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत ब्रोकरेज फर्म झीरोधाची स्थापना केली होती. दोन्ही भावांची एकूण संपत्ती अनुक्रमे 1.1 अब्ज डॉलर आणि 2.7 अब्ज डॉलर आहे. (Latest Marathi News)

17व्या वर्षी नोकरी

निखील कामथ यांचा इथवरचा प्रवास इतका सोपा नव्हता. निखील यांनी वयाच्या 17व्या वर्षी नोकरीला सुरुवात केली. कॉल सेंटरमध्ये त्यांनी पहिल्यांदा नोकरी केली होती. जिथे त्यांना केवळ 8 रुपये पगार होता. मात्र त्यांनी नोकरीवर अवलंबून न राहता शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु केली.

आधी ते ट्रेडिंगबाबतही गांभीर्याने विचार करत नव्हते. मात्र शेअर बाजारातील पैसा कमवून देण्याची क्षमता ओळखून त्यांनी पूर्ण लक्ष तिथे वळवलं. आणि त्याचा परिणाम आज अवघ्या देशाला दिसतोय. आपल्या स्ट्रगलविषयी त्यांनी मुलाखतीत सविस्तर सांगितलं होतं.

सर्वात आधी वडिलांनी आपली सेविंग निखील यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी दिली होती. आपल्या मुलावर त्यांनी विश्वास दाखवला होता. निखील यांनीही त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. हळूहळू त्यांनी शेअर बाजारातील बारकावे शिकून घेतले. मात्र आता आपण शेअर बाजारात चांगले पैसे कमावू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि झीरोधाची स्थापना केली.

झीरोधाची स्थापना करण्याआधी त्यांनी आपले मोठं बंधू नितीन कामत यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली. त्यांची ही फर्म शेअर बाजाराशी निगडीत कामकाज करत असे. त्यानंतर 2010 मध्ये दोघांनी मिळून झीरोधाची स्थापना केली. झीरोधा आज देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

SCROLL FOR NEXT