Cabinet Meeting Decision: अवकाळीमुळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 9 निर्णय

Cabinet Meeting Decision: सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे.
Farmer
Farmer Saam TV
Published On

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.

या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मदत व पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Farmer
Sushma Andhare On Fadnavis: 'झुकेगा नही घुसेगा साला' डायलॉग भारीच, पण तुमच्या घरात एक बाई घुसली... सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

मंत्रिमंडळ बैठकीतीन इतर महत्त्वाचे निर्णय

>> ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद. (महसूल विभाग) (Latest Marathi News)

>> नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार. (नगर विकास-१)

>> देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल. (नगर विकास-१)

>> सेलर इन्स्टीट्यूट "सागर" भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण. (महसूल)

>> अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

>> महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी. (ऊर्जा)

Farmer
NCP Upset on Nana Patole : काँग्रेस नेत्यांनंतर राष्ट्रवादीही नाना पटोलेंवर नाराज? कारणही आलं समोर

>> अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)

>> नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com