Flood In Assam News Updates, Assam Latest Marathi News Twitter/@ANI
देश विदेश

Flood In Assam: आसाममध्ये पुरामुळे नुकसान, 25 ठार, हजारो एकरांवरील पिके नष्ट

आसाममध्ये पुराचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पूर थांबत नाहीये. भूस्खलनामुळे तेथील परिस्थिती गंभीर होत आहे.

वृत्तसंस्था

आसाममध्ये पुराचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पूर थांबत नाहीये. भूस्खलनामुळे तेथील परिस्थिती गंभीर होत आहे. नागाव भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नागावमध्ये 3 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. आसाममधील 34 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमध्ये सध्या पूरस्थिती आहे. आसाममध्ये आतापर्यंत 25 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला असून 7 लाख लोक बाधित झाले आहेत. तसेच पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकरी म्हणतात, 'आम्ही आमच्या पिकाचा मोठा भाग गमावला आहे आणि जे उरले आहे ते वाचवण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. जेणेकरून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी काहीतरी खायला मिळेल.' (Flood In Assam)

मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसलेल्या आसाममधील रेल्वे रुळांवरही वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. रेल्वेने मे आणि जून महिन्यात वेगवेगळ्या झोनच्या 25 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, या गाड्यांमध्ये प्रवास करण्यापूर्वी, प्रवाशांनी संबंधित चौकशी क्रमांकांवरून गाड्यांच्या स्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग विभागात पाणी साचल्याने आणि दरड कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या शेजारील राज्यांतील रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?

Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षित करणं आत्ताच टाळा

Marathi Actress : ॲक्शन सीन करताना मालिकेच्या नायिकेला दुखापत; नाकावर पट्टी लावून करतेय शूटिंग, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT