Close-up of a New World Screwworm Fly (Screwworm) — Flesh-eating larvae can infest wounds, posing a serious risk to humans and animals. Saam Tv
देश विदेश

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Screwworm Fly Infestation Raises: माणसाला संपवणारी नरभक्षक माशी आता तुमच्या घरापर्यंत पोहचू शकते... ही मासं खाणारी माशी नेमकी कुठे आढळली? या माशीमुळे नेमका कोणाला धोका आहे? या माशीचा प्रादुर्भाव कोणत्या देशात झालाय?

Omkar Sonawane

मांस खाणाऱ्या माशीबद्दल तुम्ही कधी ऐकलयं... होय मांस खाणारी माशी... अमेरिकेत मांस खाणाऱ्या माशी आढळलीये. या माशीनं संपुर्ण मानवजातीचं टेन्शन वाढवलंय. अल-साल्वाडोरहून परतलेल्या एका रुग्णाला न्यू वर्ल्ड स्क्रूवर्मचा प्रादुर्भाव झाला.. आणि अमेरिकेची आरोग्य संस्था सीडीसीसोबतच जगभरात खळबळ माजली... माणसाचं मांस खाणारी ही स्क्रूवर्म माशी नेमकी आहे तरी कशी

स्क्रूवर्म माशी मांस खाण्यासाठी स्क्रूड्रायव्हरसारख्या शरीरात घुसतात. त्यामुळे त्याचं नाव 'स्क्रूवर्म' असं पडलं. स्क्रूवर्म माशी आकाराने घरातील माशांसारख्याच असतात किंवा थोड्या मोठ्या असू शकतात. ही माशी निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असते मागच्या भागावर तीन काळ्या पट्ट्या असतात आणि डोळे नारंगी रंगाचे असतात.

दरम्यान ही माशी माणूस आणि प्राण्यासाठी धोकादायक का असते आणि मानवजातीला संपवणाऱ्या या माशीचा विळखा कसा पडतोय... आणि ती कशी हळूहळू उच्छाद मांडते

मादी स्क्रूवर्म माशी प्राण्यांच्या जखमेवर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडल्यावर शेकडो अळ्या शरीरात किंवा मांसात प्रवेश करतात. जर यावर उपचार केला नाही, तर यामुळे मृत्यूही होऊ शकतो. जखम झालेल्या माणसांला या माशीपासून अधिक धोका असतो. उपचाराचा एकमेव मार्ग म्हणजे जखमेतील सर्व अळ्या काढून ती पूर्णपणे स्वच्छ करणं. वेळेत उपचार केल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल.न्यू वर्ल्ड स्क्रूवर्मची प्रकरणं क्यूबा, हैती, डोमिनिकन रिपब्लिक आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये दिसतात.

स्क्रूवर्म माशांचा प्रकोप 2023 ला पनामामध्ये सुरु झाला..तर 2025 च्या जुलै महिन्यात मेक्सिकोनं अमेरिकेच्या सीमेपासून सुमारे 595 किलोमीटर दक्षिणेकडे याचं नवीन प्रकरण नोंदवलं. त्यामुळे प्राण्यामध्ये झपाट्यानं पसरणाऱ्या स्क्रूवर्म माशांचा भविष्यात माणसालाही धोका निर्माण होऊ शकतो... त्यामुळे तुम्हाला जखम असेल आणि ती जखम वेळीच भरत नसले तर वेळ घालवू नका तातडीनं डॉक्टर कडे जा आणि औषधोपचार करा. कारण मानवजातीला आता माशीनं संकटात आणलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT