Accident Saam tv
देश विदेश

सिक्कीमला गेलेल्या पाच ठाणेकरांचा दुर्देवी मृत्यू, नेपाळमध्ये चार जण बेपत्ता

ठाणेहून सिक्कीमला पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे : ठाणेहून सिक्कीमला पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा कार अपघातात (car accident) मृत्यू झाला आहे. पर्यटकांची कार खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाता मृत पावलेल्या पुनमीया कुटुंबीय आणि अमित परमार यांचे मृतदेह सोमवारी ठाण्यात (Thane) आणणार आहेत. त्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सुरेश पुनमीया, त्यांची पत्नी तोरण,मुलगी हिरल(१४) आणि मुलगी देवांशी (१०) अशी मृतांची नावे आहेत. तर नेपाळ (Nepal) येथे पर्यटनासाठी गेलेल्या त्रिपाठी कुटुंबातील चार जण विमान प्रवासातून बेपत्ता झाले आहेत.

तर दुसरीकडे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेल्या त्रिपाठी कुटुंबातील चार जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशोक त्रिपाठी(५४), वैभवी बांदेकर-त्रिपाठी(५१), मुलगा धान्यस्य त्रिपाठी(२२) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी (१८) अशी बेपत्ता झालेल्या प्रवाशांची नावं आहेत.या दोन्ही घटनेमुळं ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील अशोक त्रिपाठी यांच्यासह बेपत्ता झालेल्यांमध्ये परिवारातील चार सदस्यांचा समावेश आहे. अशोक त्रिपाठी (५४), वैभवी बांदेकर-त्रिपाठी (५१), मुलगा धान्यस्य त्रिपाठी (२२) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी (१८) हे अजूनही विमानसह बेपत्ता आहेत. हे सगळे नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. नेपाळच्या पोखरा येथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडले. ते विमान चार ठाणेकरांसह बेपत्ता असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली आहे.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT