पंजाबमधील काँग्रेस नेते, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळी घालून हत्या

पंजाबमधील काँग्रेस नेते, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala ) यांची रविवारी गोळी घालून हत्या ( Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sidhuu moosewala
Sidhuu moosewala Saam tv

पंजाब : पंजाबमधील काँग्रेस नेते, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala ) यांची रविवारी गोळी घालून हत्या ( Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. पंजाबच्या (Punjab ) मनसाजवळील जवाहरके गावात मूसेवाला यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (Punjabi Singer Sidhu Moosewala Shot Dead )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, गायक मूसेवाला यांना गँगस्टर लोकांनी धमकी दिली होती. त्यानंतर पंजाबच्या आम आदमी सरकारने मूसेवाला यांना ४२४ व्हीआयपी सुरक्षा पुरवली. मात्र, सरकारने एका दिवसात ही सुरक्षा मागे घेतली. आज मूसेवाला यांच्यावर जवाहरके गावात जीवघेणा गोळीबार झाला. मूसेवाला यांच्या गोळीबार झाल्यावर रुग्णालयात दाखल केले.मात्र, मूसेवाला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Sidhuu moosewala
नेपाळमध्ये २२ प्रवाशांसह विमान बेपत्ता; ४ भारतीयांचा समावेश, शोध मोहिम सुरु

सिद्धू मूसेवाला कोण होते ?

सिद्धू मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव हे शुभदीप सिंह सिद्धू होते. मूसेवाला यांचे लाखो चाहते होते. सिद्धू हे गँगस्टर रॅपसाठी लोकप्रिय होते. मूसेवाला यांची आई या गावाच्या सरपंच आहेत. मूसेवाला यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूसावाला यांनी गायन कला शिकली आणि कॅनडा देशात गेले.

मूसेवाला हे पंजाबमधील वादग्रस्त गायक म्हणून ओळखले जायचे. मूसेवाला हे खुलेआम पिस्तूल बाळगण्याचा संस्कृतीला गायनातून प्रोत्साहन द्यायचे. तसेच गँगस्टर लोकांवर गाण्यातून टीका करायचे. शीख योद्धे यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मूसेवाला यांना माफी देखील मागावी लागली होती.

Edited By - vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com