Gujarat Fake Toll Plaza Saam Tv
देश विदेश

Gujarat Fake Toll Plaza: गुजरातमध्ये फेक टोलमधून कोट्यवधी रुपयांची कमाई, माजी सैन्याधिकाराचा समावेश?

साम टिव्ही ब्युरो

>> प्रसाद जगताप

Gujarat Fake Toll Plaza:

गुजरातमध्ये फेक टोल प्लाझा चालवणारी एक टोळी पोलिसांनी पकडलीये. आरोपींनी या टोल मार्गावरचा रस्ता दुरुस्त केला आणि येणारा जाणाऱ्याकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये काही लोकांनी बोगस सरकारी ऑफिस उघडलं होतं. या ऑफिसमधून या लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले होते. ही गोष्ट ताजी असताना एका टोळक्याने चक्क फेक टोल प्लाझा उभा केलाय. या टोलनाक्यावरून आरोपींनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून पैसेही उकळलेत. द हिंदू या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरातचा मोरबी जिल्हा, हो तोच जिल्हा जिथे पुलाची दुर्घटना घडली होती आणि यात १४१ जणांचा मृत्यू झाला होता. याच मोरबीच्या बामनबोर कच्छ राष्ट्रीय महामार्गावर मोरबी वांकानेर दरम्यान टोल प्लाझा उभारण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सकडून हे लोक २० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत पैसे उकळायचे. (Latest Marathi News)

खरं तर या मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर ११० ते ५९५ रुपये टोल आकारला जात होता. या मार्गावर टोल स्वस्त असल्याने अनेकांनी कुठलाही विचार न करता टोल दिले. या टोलमधून या टोळक्याने ७५ कोटी रुपये जमा केल्यांचं सांगण्यात येतंय. गेली दीड वर्षे हा टोलनाका कुठल्याही अडचणी शिवाय सुरु होता. पण त्यांच बिंग फुटलं आणि पोलिसांनी या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यापैकी एक सिरॅमिक फॅक्ट्रीचा मालक आहे, आरोपींमध्ये राजवीर सिंह, धर्मेंद्र सिंह, युवराज सिंह आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश.

या भागात टोल वसूल करणारी जी कंपनीये त्यांनी या आरोपींविरोधात तक्रार करण्यास नकार दिलाय. अशी माहती मोरबी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी.टी पांड्या यांनी दिलीये. या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दखल घेतली. प्राधिकरणाने स्थानिक पोलिसांकडे हा टोल फेक असल्याची तक्रार दिलीये. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय.

गुजरातचे माजी पोलीस अधिकारी रमेश सावनी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलीये. फेक टोलवाले दिवसाला १५ लाख रुपये गोळा करायचे, अशा प्रकारे त्यांनी ८२ कोटी रुपये उकळले असावे असा अंदाज सावनी यांनी व्यक्त केलाय. गेली दीड वर्षे हा टोलनाका सुरु होता आणि प्रशासनाला याबाबत कळलं कसं नाही? याबद्दलही सावनी यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT