Chhattisgarh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये लग्नावरून परत येत असताना वऱ्हाडींच्या वाहनाला भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.

Priya More

Summary -

  • छत्तीसगडमध्ये भयंकर अपघात झाला

  • कार-ट्रकची समोरासमोर धडक होऊन ५ जणांचा मृत्यू

  • अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत

  • अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे

छत्तीसगडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ जवानांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील सुकली गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. नवागड येथून लग्नाला गेलेले वऱ्हाडी कारने परत येत होते. याचवेळी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघाामध्ये ५ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवागडमध्ये राहणारे ८ जण कारने पंतोरी गावात लग्नासाठी जात होते. लग्नानंतर हे सर्वजण परत जात होते. त्याचवेळी सुकली गावाजवळ भरधाव कारला ट्रकने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला. कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना पुढील उपचारांसाठी बिलासपूर येथे पाठवण्यात आले. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लष्करी जवानांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एकाचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. सर्व मृत आणि जखमी नवगढमधील एकाच परिसरातील रहिवासी होते. ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT