गुरुग्राममधील तरूणाला पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोव्हिशिल्डचा! Saam Tv
देश विदेश

गुरुग्राममधील तरूणाला पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोव्हिशिल्डचा!

सर्टिफिकेट दाखवल्यानंतरही दुसऱ्यांदा लस घेताना वेगळी लस दिल्याचा आरोप

वृत्तसंस्था

हरियाणा - गुरुग्राममधील एका तरूणाला कोरोना लसीचे वेगवेगळे डोस देण्यात आले आहे. पहिल्या लसीचे सर्टिफिकेट दाखवल्यानंतरही दुसऱ्यांदा लस घेताना वेगळी लस दिल्याचा आरोप या तरूणाने केला आहे. हरतीरथ सिंह असे आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

हे देखील पहा -

त्यांनी आपल्याला १ डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोव्हिशिल्डचा दिल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "कोरोना लसीचं प्रमाणपत्र दाखवूनही पहिला डोस-कोवॅक्सिन आणि दुसरा डोस-कोव्हिशील्ड. कृपया काय करावं ते लवकर सांगावं. रोझवुड सिटी, सेक्टर 49, गुडगाव इथल्या लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला." 

८ जून रोजी या व्यक्तीने पहिला डोस कोवॅक्सिन लसीचा  घेतला होता. त्यानंतर तो दुसऱ्या डोस साठी केंद्रावर पोहोचला असता या व्यक्तीला कोव्हिशील्ड या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोव्हिशीलड्ची दुसरी लस घेतल्यानंतर हरतीरथला काही काळ डॉक्टरांच्या देखरेख खाली  ठेवण्यात आले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT